विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्याआधीच विरोधकांनी पायऱ्यावर निषेध व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या घालून निषेध व्यक्त केला. शरदचंद्र गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काळा शर्ट आणि हातात बेड्या घालून विधिमंडळात प्रवेश केला. महाराष्ट्रात विरोधकांना व्यक्त होऊ दिलं जात नाही. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. आमचे मुलभूत अधिकार दडपले जात आहेत. अमेरिका आपला बाप नाही. आम्हाला व्यक्त होऊ दिलं जात नाही. अमेरिकेनं ज्या पद्धतीनं भारतीयांना वागणूक दिलीय ते चुकीचं आहे.