वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केले असून, कराड यांनी पुण्यातील पाषाण रोड येथील सीआयडीच्या मुख्यालयात आत्मसमर्पण केले. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, मनोज जरंगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे आणि मकोका सुद्धा लागायला हवा अशी मागणी त्यांनी केली, यात जे दोषी असतील त्यांना सर्वांना शिक्षा झाली पाहिजे अन्यथा मराठा समाज आता शांत बसणार नाही असा इशारा देखील सरकारला दिला आहे.