रवींद्र चव्हाणांकडे कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सोपवली गेली असून, अध्यक्ष बनल्यानंतरची पहिलीच मुलाखत त्यांनी दिली. भाजपचे वरिष्ठ नेते आणि नवनिर्वाचित भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेगवेगळ्या विषयांवर बातचीत केली असून, भारतीय जनता पार्टीमध्ये कोणाला कधी आणि कोणती जबाबदारी मिळेल असं म्हणत जी जबाबदारी मिळाली आहे ती एकत्रपणे राहून निभावली जाईल असं ते म्हणाले. भाजपच्या घवघवीत यशानंतर महायुती म्हणून काम करणं आता सोपं जाईल असं वक्तव्य त्यांनी केलं. लोकसभेतील पराभवावर बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली असून विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह पसरवल्याचं म्हंटल. विरोधकांनी रडीचा डाव खेळत खोटा नॅरेटिव्ह पसरवला गेला असं ते म्हणाले.