बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच तापलंय. या प्रकरणी रोहित पवार यांनी वक्तव्य केलं असून कोणाबरोबर फोटो काढला जातो यामुळे कनेक्शन लावणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हंटल, तर या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर योग्य प्रकारे कारवाई केली जावी आता त्याचावर खंडणीच्या गुन्ह्यात तपासणी केली जात होती, तर या हत्या प्रकरणातही त्याची तपासणी करून योग्य ते कलम लावावेत असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं.