खासदार संजय राऊत यांना मातोश्रीवरच्या खोलीत कोंडून ठेवल्याचा दावा केला जातोय.. उद्धव ठाकरेंसमोरच राऊतांवर इतर नेते भडकल्याचीही चर्चा आहे. मात्र संजय राऊतांनी या सगळ्या चर्चांचं खंडन केलंय. खासदार संजय राऊत यांना मातोश्रीवर एका खोलीत बंद केल्याचा दावा पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केलाय. त्यावरून सोशल मीडियावर दुसरीच चर्चा रंगली. संजय राऊतांना मारहाण झाल्याच्या चर्चांना ऊत आला. सत्ताधाऱ्यांनीही या मुद्यावरून राऊतांवर तोफ डागलीय. तर सर्वांना पुरून उरेन, असा पलटवार करत संजय राऊतांनी सर्व चर्चांना विराम दिला नाकारल्या आहेत.