वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे काही कार्यकर्ते सीआयडी मुख्यालयाबाहेर आले होते. वाल्मिक कराड आज आत्मसमर्पण करणार का? हा सवाल उपस्थित होत असतानाच कराड आणि धनंजय मुंडे यांचे काही समर्थक आज सीआयडी मुख्यालयाबाहेर आले. या खुनाशी वाल्मिक कराड यांचा काही संबंध नाही, आम्ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो आहोत, त्यांचा तपास चुकीच्या दिशेने सुरु असल्याचं समर्थकांनी सांगितले.