बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडेचा पत्ता कट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्री पदापासून लांब ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण तसंच अंतर्गत रस्सीखेच म्हणून बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवारच असणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राजकीय आरोप आणि हत्येचे आरोप टाळण्यासाठी अजित पवारांकडे बीडचे पालकमंत्री पद देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर बीडच्या पालकमंत्री पदावर हा तोडगा काढण्यात आला असल्याची सूत्रांची माहिती आहे.