
पुणे: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सरकार या घटनांना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिक काही ठिकाणी झटका मशीन वापरत आहेत. पुण्यातील किसान कृषी प्रदर्शनात ही झटका मशीन पाहायला मिळाली. प्रदर्शनात सोलर झटका मशीन मांडणाऱ्या स्वप्नाली यांनी ही मशीन कशी काम करते ? याविषयी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
Last Updated: December 16, 2025, 18:35 ISTपुणे: मेळघाटातील आदिवासी बोलीभाषा, संस्कृती आणि लोकजीवनाचा अद्वितीय प्रवास उलगडणारे भव्य प्रदर्शन यंदा पुणे राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. मेळघाट येथील राईस फाउंडेशनच्या वतीने भगवान बुद्धांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एफ.सी. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात आदिवासी भाषांचा आदिम काळापासून ते आधुनिक एआय तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. या विषयीची अधिक माहिती जाणून घेऊ
Last Updated: December 17, 2025, 14:34 ISTकल्याण डोंबिवली: गेल्या 16 वर्षांपासून सुप्रिया यांनी सुरू केलेला पाळणाघर नोकरदार महिलांसाठी महत्त्वाचे पॉइंट ठरले आहे. ज्या महिला सुशिक्षित आहेत, त्यांना त्यांच्या लहान मुलांमुळे बाहेर पडता येत नाहीत. अशा महिलांना सुप्रिया यांच्या पाळणाघराने चांगलाच दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे ज्या मुलांना महागड्या ट्रिटमेंट करून सुद्धा बोलता येत नव्हतं अशा मुलांना या घराणं बोलक बनवले. शिवाय, अपंग मुलांना चालायला अधिक क्रियाशील बनवले आहे.
Last Updated: December 17, 2025, 14:41 ISTबीड : बीड जिल्ह्यातील नित्रुड गावचा तरुण प्रवीण पवार याने शिक्षण घेत असतानाच शेतीतून उल्लेखनीय यश मिळवून दाखवले आहे. सध्या कृषी विषयक पदवीचे शिक्षण घेत असलेला प्रवीण पवार अवघ्या दीड एकर क्षेत्रामध्ये कांदा लागवड करून एकाच हंगामात प्रतिवर्षी साडेतीन ते चार लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा कमावत आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी त्याचा हा प्रयोग प्रेरणादायी ठरत असून शेतीतूनही आर्थिक स्थैर्य मिळू शकते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.
Last Updated: December 17, 2025, 13:37 ISTनाशिक : दोन उच्चशिक्षित तरुणींनी नोकरीतील मर्यादित गरजांच्या पूर्तीला नकार देत, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नाशिकमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. नोकरीत फक्त गरजा भागतात, पण आम्हाला स्वप्नसुद्धा पूर्ण करायची आहेत, या निर्धाराने त्या आज महिन्याकाठी सुमारे 70 हजार रुपयांची बक्कळ कमाई करत आहेत. अश्विनी आणि भूमी नावाच्या या मैत्रिणींचा उद्योजिका बनण्याचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: December 16, 2025, 19:34 ISTपुणे: सध्या बाजारात गाजराची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. आज आपण गाजरापासून एक पारंपारिक आणि पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत. जो सुमारे 8 ते 10 दिवस टिकेल. हा पदार्थ आहे गाजराचे घारगे. गाजराचे घारगे सोप्या पद्धतीने कसे बनवायचे चला तर मग जाणून घेऊया.
Last Updated: December 16, 2025, 19:03 IST