सचिन जाधव, प्रतिनिधी सातारा : सातारा तालुक्यातील सासपडे गावात हरपळवाडी रस्त्या लगत असणाऱ्या एका कृषी सेवा केंद्राच्या दुकानात समोर सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या कैद झाला आहे. यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील पंधरा दिवसापासून गावातील दहाहून अधिक कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडल्यामुळे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.