शहापूर : महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यानं दैना उडाली आहे. शहापूर तालुक्यात अचानक आलेल्या मुसळधार पावसाने अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. घरातलं पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी भिंतीला भगदाड पाडलं. शहापूर तालुक्यातल्या अर्जुनली गावात अनेक घरात पाणी शिरलं आहे.