TRENDING:

April Fool 2024 : एप्रिलच्या 1 तारखेलाच का बनवलं जातं फूल? रंजक आहे एप्रिल फूलचा किस्सा

Last Updated:

तुम्ही 1 एप्रिलला एप्रिल फूल म्हणून हा दिवस साजरा करत असाल पण हा दिवस साजरा का केला जातो, त्याची सुरुवात कधी आणि कशी झाली तुम्हाला माहिती आहे का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : एप्रिल फूल बनाया... 1 एप्रिल प्रत्येकाच्या तोंडून हे ऐकायला मिळेल. हा दिवस म्हणे फसवण्याचा, मूर्ख बनवण्याचा दिवस. या दिवशी लोक एकमेकांसोबत थट्टा मस्करी करतात, एकमेकांना फसवतात. या दिवशी एखाद्याची फसवणूक करण्यासाठी काही जण तर अनेक दिवसांपासून प्लॅनिंग करत असतात. पण एप्रिल फूल करण्यासाठी एक तारीखच का निवडली? याचा कधी विचार केला आहे का?
एप्रिल फूल
एप्रिल फूल
advertisement

एप्रिल फूल जवळ आला आहे. अनेकांना एप्रिल फूल करण्याच्या तयारीत तुम्ही असाल. वेगवेगळ्या आयडिया शोधत असाल. पण याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? हा दिवस का साजरा केला जातो, या दिवसाची सुरुवात कधीपासून आणि का झाली, ती कुणी केली, सर्वात पहिलं एप्रिल फूल कुणी केलं होतं? एप्रिल फूलचा इतिहास, याचे किस्से खूपच रंजक आहेत.

advertisement

चॅटिंग करताना सहज म्हणता Hmm; पण याचा अर्थ आणि फुलफॉर्म माहिती आहे का?

एप्रिल फूलची पहिली स्टोरी

इंग्लंडचा (King of England Richard II) राजा रिचर्ड II आणि बोहेमियाची राणी अॅनी (Queen of Bohemia Anne) यांनी त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. एंगेजमेंटची तारीख 32 मार्च ठेवण्यात आली होती. ही बातमी ऐकून लोकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र, जेव्हा लोकांचं सेलिब्रेशन करून झालं, तेव्हा त्यांना कळलं की कॅलेंडरमध्ये 32 मार्च अशी कोणतीही तारीख नाही. त्यावेळी राजा रिचर्ड आणि राणी अॅनी यांनी आपली मस्करी केली आणि मूर्खात काढलं, असं लोकांच्या लक्षात आलं. आता 32 तारीख नसते म्हणजे ती तारीख झाली 1 एप्रिल, तर तेव्हापासून एप्रिल फूल डे साजरा (April fool day) करण्यास सुरुवात झाली.

advertisement

एप्रिल फूलची दुसरी स्टोरी

याशिवाय आणखी एक मान्यता एप्रिल फूल साजरा करण्यामागे असल्याचं म्हटलं जातं. ही घटना सन 1582 ची फ्रान्स (France) मधील आहे. त्यावेळी चार्ल्स पोपने फ्रान्स ज्युलियन कॅलेंडर (Julian calendar) बदललं आणि त्याच्याजागी नवीन रोमन कॅलेंडर आणलं. त्यानंतर फ्रान्सला नवीन वर्ष वसंत विषुववृत्तात साजरं करायचं होतं आणि तो दिवस होता 1 एप्रिल. पण नागरिकांना (Citizens of France) यामागील योजना समजली नाही आणि ते 1 एप्रिललाच नवीव वर्ष समजू लागले. तेव्हा फ्रान्सचे जवळपास सगळेच नागरिक हे फूल म्हणजेच वेडे ठरले होते. देशातल्या सर्वांचीच मिश्किल फसवणूक झाली होती. तेव्हापासून 1 एप्रिल हा दिवस लोकांना फूल म्हणजेच गमतीत मूर्ख बनवण्यासाठी साजरा केला जातो.

advertisement

well : तुम्हाला माहितीये का, विहीर चौकोनी किंवा त्रिकोणी का नसते? गोलच का असते?

भारतात एप्रिल फूलची सुरुवात कधी झाली?

काही रिपोर्टनुसार, ब्रिटिशांनी हा दिवस भारतात 19व्या शतकात  साजरा करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत तो साजरा करण्याची क्रेझ वाढली आहे. वेदनेने जोरजोरात किंचाळतात झाडे-वनस्पती; संशोधनात मोठा दावा सोशल मीडियावरह त्याच्याशी संबंधित मीम्स, जोक्स प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे आजचा दिवस इतरांची चेष्टा-मस्करी करण्यात नक्की घालवा. पण कोणालाही दुखवू नका.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
April Fool 2024 : एप्रिलच्या 1 तारखेलाच का बनवलं जातं फूल? रंजक आहे एप्रिल फूलचा किस्सा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल