लहान मुलं डॉक्टर डॉक्टर खेळताना कुणालातरी आपला रुग्ण बनवतात. या व्हिडीओतील चिमुकलीने त्याच्या आजीला आपला पेशंट बनवलं आहे. व्हिडीओत पाहू शकता मुलगा दातांचा डॉक्टर झाली आहे. डॉक्टर सेटच्या खेळण्यातील दात काढायचा चिमटा ती हातात घेते आणि आजीला तोंड उघडायला सांगून तिच्या तोंडात घालते. आजीचा दात काढायचा ती प्रयत्न करतो. पण आजीचे सगळे दातच तोंडातून बाहेर येतात.
advertisement
यानंतर चिमुकलीची रिअॅक्शनही पाहण्यासाठी आहे. आजीचे सगळे दात तोंडातून बाहेर आल्यानंतर चिमुकली धक्क्यात जाते. हे कसं झालं? असा प्रश्न तिला पडतो. एकंदर पाहिलं तर आजीच्या तोंडातील कवळी बाहेर आली आहे. आजी हसते आहे. पण निरागस चिमुकलीला ते माहिती नाही. तिच्यासाठी ते खरे दातच आहेत. त्यामुळे तिला शॉक बसला आहे.
cute_sangwan.saanvi इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. कर्म करायला जाते आणि कांड होतं, डॉक्टरसाहेब तेव्हापासून गायब आहेत. एक दात काढायला आल्या होत्या आणि संपूर्ण जबडा काढला, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
व्हिडीओवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.