अमेरिकेच्या फ्लोरिडामधील हे प्रकरण आहे. जोमनाथन पॅट्रिक विन्सलो असं या व्यक्तीचं नाव. 57 वर्षांची ही व्यक्ती जिचा बर्थडे होता. त्या दिवशी त्याने ट्रेन चोरली आहे. तो प्रथम ट्रेन डेपोमध्ये पोहोचला. रॉक संगीत वाजवत तो गाडीत घुसला. धक्कादायक म्हणजे ट्रेनच्या चाव्या त्याच्याकडे होत्या.
advertisement
आता त्या त्याच्याकडे कशा गेल्या. तर त्याने सांगितलं, तो पूर्वी इथं काम करायचा. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याला ट्रेनच्या चाव्या दिल्या. चाव्या घेतल्यानंतर विन्सलोने ट्रेन सुरू केली आणि तो ट्रेन घेऊन शहराच्या दिशेने गेला. कोणीही त्याला किंवा ट्रेनला थांबवू शकलं नाही. कितीही विचित्र वाटत असलं तरी विन्सलोने दोन प्रवाशांना ट्रेनमध्ये बसवलं होतं. त्या प्रवाशांना माहिती नव्हतं. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे या सगळ्यात कोणतंही गंभीर नुकसान झालं नाही. अखेर पोलिसांनी त्याला पकडलं.
पोलीस या संपूर्ण प्रकरणाची खूप गांभीर्याने चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की विन्सलोला ट्रेन चालवण्याची परवानगी नव्हती. पोलिसांना लवकरच त्याची ओळख पटवण्यात यश आलं. तो त्याची गाडी डेपोमध्ये सोडून गेला होता. गाडीचं इंजिन चालू होतं. संगीतही वाजत होतं. जेव्हा पोलिसांनी विन्सलोची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की त्याने ट्रेन उधार घेतली होती. त्याने सांगितलं की त्याचा वाढदिवस आहे. तो उत्साहित होता.
पोलिसांना त्याच्या खिशात एक पाईप सापडला. विन्सलो म्हणाला की तो वीड पाईप आहे. पण पोलिसांनी सांगितलं की तो मेथाम्फेटामाइन पाईप होता. विन्सलोवर घरफोडी, कारचोरी आणि ड्रग्ज हाताळल्याचा आरोप आहे. विन्सलोला काउंटी तुरुंगात नेण्यात आलं.