टीटीई तुम्हाला उठवू शकत नाही
रेल्वेच्या नियमानुसार, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत तिकीट चेक करण्यासाठी टीटीई तुम्हाला उठवू शकत नाही. सकाळी सहा वाजल्यावर तुम्हाला मिडल बर्थ ओपन करावी लागते, जेणेकरून प्रवासी बसून प्रवास करू शकतील. रात्री रेल्वेत जोरात गाणी ऐकण्यास व जोरात बोलण्यास मनाई असते.
रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान तिकीट होणार नाही चेक
advertisement
अनेक रेल्वेगाड्या लांबपल्ल्याच्या असतात, अशा वेळी प्रवासी ट्रेनमध्ये झोपतात. त्या वेळी टीटीई तिकीट तपासायला आले की प्रवाशांची झोपमोड होते. रेल्वेच्या नियमानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत तिकीट चेक करण्यासाठी टीटीई तुम्हाला उठवू शकत नाही; पण ज्यांचा प्रवास रात्री 10 वाजता सुरू होतो, त्यांना हा नियम लागू नाही, त्यांचं तिकीट टीटीई चेक करू शकतात.
whisky: भारतात तयार झाली व्हिस्की; एका बाटलीच्या किंमतीत येईल कार, आता उरले फक्त 2 खंबे!
प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनही करता येतो प्रवास
रेल्वेच्या एका नियमानुसार, तुमच्याकडे तिकीट काढण्यास वेळ नसल्यास तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता. प्रवासात टीटीईकडून बोर्डिंग स्टेशनपासून जिथे जायचं आहे तिथपर्यंतचं तिकीट घेऊ शकता.
सामानाच्या वजनाची मर्यादा
रेल्वेच्या नियमानुसार, प्रवासी प्रवासादरम्यान 40 ते 70 किलो सामान नेऊ शकतात. त्याहून जास्त वजन असेल तर त्याचं भाडं भरावं लागेल. टीटीई त्याचं भाडं घेईल व पावती देईल.
जगातलं चौथं सर्वांत मोठं नेटवर्क
भारतीय रेल्वे हे जगातलं चौथं सर्वांत मोठं नेटवर्क आहे. पहिल्या नंबरवर अमेरिका आहे. तिथे 250,000 किमीचं नेटवर्क आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन असून, तिथे 124,000 किमी नेटवर्क आहे. तिसऱ्या क्रमांकावर रशिया असून, तिथे 86000 किलोमीटर नेटवर्क आहे. पाचव्या क्रमांकावर भारत असून, भारतात 68,525 किमीचं रेल्वे नेटवर्क आहे.