बिहारमधील सासाराम जिल्ह्यातील कारगर गावात रेल्वे स्टेशनजवळ, एक महिला राहत होती. रूबी सिंग असं तिचं नाव. रूबी भाभी एका साध्या कुटुंबातील महिला, पण तिने निवडलेला मार्ग सोपा नव्हता. तिने घरातूनच ब्राउन शुगर म्हणजेच ड्रग्जचा व्यवसाय सुरू केला. रुबी यूपीहून ब्राउन शुगर आणायची, त्यात मादक पावडर मिसळायची आणि नंतर ती बिहार आणि झारखंडच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवायची. तिचा व्यवसाय इतका मोठा होता की रांचीच्या कानाकोपऱ्यात तिची ब्राउन शुगर विकली जात असे. बिहार आणि झारखंडच्या अनेक भागात तिचं ड्रग्ज नेटवर्क पसरवलं होतं.
advertisement
नवऱ्याला खूश करायचंय! सतत प्रेग्नंट व्हायची बायको, नवव्या प्रेग्नन्सीला घडलं ते भयानक
गेल्या 10 वर्षांपासून रूबी ड्रग्जचा धोकादायक आणि बेकायदेशीर व्यवसाय करत होती. भाभीचा भाऊ पिंटू साह, धाकट्या बहिणीचा नवरा प्रिन्स आणि मेहुणा सूरज कुमार साह हे तिघंही या बेकायदेशीर कामात तिचे भागीदार होते.
व्यवसायात मुलींचा सहभाग
रुबीचा व्यवसाय छोटासा नव्हता, ती इतकी हुशार होती की तिने तिच्या व्यवसायात मुलींनाही सामील करून घेतले. या मुली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ड्रग्ज घेऊन जात असत. रुबीचा असा विश्वास होता की कोणीही मुलींवर संशय घेणार नाही आणि अशा प्रकारे तिचा व्यवसाय सुरळीत चालू राहिल. तिची ही युक्ती बराच काळ यशस्वी झाली. पण नंतर रुबी भाभीचा वाईट काळ सुरू झाला.
20 हून अधिक गुन्हे दाखल
पोलिसांना रुबीच्या व्यवसायाची माहिती होती. तिच्याविरुद्ध 20 हून अधिक गुन्हे दाखल झाले. तिच्याविरुद्ध रांचीच्या सुखदेव नगर पोलीस ठाण्यात 13, कोतवालीमध्ये 2, लोअर बाजारमध्ये 2 आणि गोंडा, खेलगाव, जगन्नाथपूर, पुंडग, अर्गोरा अशा अनेक पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध खटले सुरू होते. तरीही ती पोलिसांच्या आवाक्याबाहेर होती.
भाभीने आत्मसमर्पण केलं
एप्रिल 2025 मध्ये जेव्हा पोलिसांनी तिच्याभोवती फास आवळण्यास सुरुवात केली, तेव्हा रुबीने 29 एप्रिल रोजी सासाराम येथील न्यायालयात आत्मसमर्पण केलं. जेव्हा रांची पोलीस सासारामला पोहोचले तेव्हा त्यांना रुबीच्या आत्मसमर्पणाची बातमी मिळाली. पोलिसांनी न्यायालयाकडून तिची तीन दिवसांची रिमांड मागितली आणि रिमांड दरम्यान रुबीने अनेक धक्कादायक खुलासे केले.
घरी कोणीच नव्हतं, सासूला घेऊन बाथरूममध्ये गेली सून, परत आलेला नवरा दृश्य पाहून गार पडला
तिने सांगितलं की तिचा ड्रग्जचा व्यवसाय फक्त पुरुषांपुरता मर्यादित नव्हता. मुलीही तिच्या पुरवठा साखळीचा भाग होत्या. अलीकडेच कोतवाली पोलिसांनी रुबीच्या रॅकेटशी संबंधित एका महिलेला अटक केली, जिच्याकडून 4 लाख 50 हजार रुपये आणि 88 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. रांचीचा ब्राऊन शुगरचा मोठा सूत्रधार कन्हैयाही तिच्याकडून ड्रग्ज खरेदी करायचा. कन्हैया त्याच्या विक्रेत्यांना कमिशन देऊन ड्रग्ज विकायचा. तो अनेक वर्षे पोलिसांच्या आवाक्याबाहेर राहिला. पण पोलिसांनी हुशारीने काम केलं. त्यांनी कन्हैयाच्या एका खास साथीदाराला त्यांचा खबरी बनवलं आणि नंतर कन्हैयाला पकडले. आता तो आणि रुबी भाभी दोघंहीतुरुंगात आहेत.