नवऱ्याला खूश करायचंय! सतत प्रेग्नंट व्हायची बायको, नवव्या प्रेग्नन्सीला घडलं ते भयानक

Last Updated:

Pregnancy News : आधीच आठ मुलींची आई असलेली मनजीत पुन्हा मुलगा होण्याच्या आशेने गर्भवती राहिली होती. यावेळी तिच्या पोटात जुळी मुलं होती. पण...

News18
News18
नवी दिल्ली : पतीला खूश, आनंदी ठेवणं हे कित्येक महिला आपलं कर्तव्य, जबाबदारी मानतात. नवरा सांगेल ते करतात. असंच नवऱ्याच्या आनंदासाठी काही करण्याची तयारी असणारी महिला, नवऱ्याला खूश करण्यासाठी प्रेग्नंट होत होती. तब्बल 8 मुलांना तिने जन्म दिला. नवव्यांदा ती प्रेग्नंट होती. पण यावेळी तिच्यासोबत जे घडलं ते भयानक आङे.
राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यातील लालगड जाटन शहरातील ही घटना आहे. राजेंद्र सिंह आणि मनजीत कौर हे कपल. मनजीत 8 मुलींची आई. आता ती नवव्यांदा प्रेग्नंट होती. यावेळी तिच्या पोटात जुळी मुलं होती. 21 जून रोजी मनजीत कौरला प्रसूती वेदना सुरू झाल्या. कुटुंबातील सदस्यांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी धाव घेतली. पण वाटेतच तिची प्रकृती बिघडू लागली. रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा श्वास थांबला
advertisement
पण प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. यासोबतच गर्भाशयात वाढणारी बाळंही जगली नाहीत. 21 जून 2025 रोजी तिचं निधन झालं.  कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की, जर वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध असती तर कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती.
प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुरिंदर शर्मा यांनी सांगितलं की, तिची गर्भधारणा ही उच्च जोखीम होती. 42 व्या वर्षी गर्भधारणा, विशेषतः जुळ्या मुलांमध्ये, अनेक गुंतागुंत निर्माण करू शकते. अशा परिस्थितीत नियमित वैद्यकीय तपासणी आणि वेळेवर रुग्णालयात जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागात जागरूकतेचा अभाव आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता नसणे यामुळे अनेकदा अशा दुर्घटना घडतात.
advertisement
आधीच आठ मुलींची आई असलेली मनजीत पुन्हा मुलगा होण्याच्या आशेने गर्भवती राहिली होती. पती राजेंद्रला मुलगा हवा होता. कुटुंबाचे नाव पुढे नेण्याच्या इच्छेने महिलेने आपला जीव गमावला. यावेळी ती महिला जुळ्या मुलांपासून गर्भवती होती. पण नंतर कळले की त्या दोन्हीही मुली होत्या.
advertisement
या प्रकरणात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. लालगड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, "आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. मृतदेह रुग्णालयात नेण्यात काही विलंब झाला की वैद्यकीय निष्काळजीपणा झाला हे तपासले जात आहे. मृताच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे आणि अहवालाची वाट पाहत आहे." अद्याप कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसला तरी, तपासाच्या निकालांवरून पुढील कारवाई केली जाईल.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
नवऱ्याला खूश करायचंय! सतत प्रेग्नंट व्हायची बायको, नवव्या प्रेग्नन्सीला घडलं ते भयानक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement