1 सप्टेंबरपासून गोल्डन टाइम सुरू! या 3 राशींचे आयुष्य बदलणार, मान सन्मानासह बक्कळ पैसा मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषानुसार सप्टेंबर महिन्यात ग्रहांची मोठी हालचाल होणार आहे. या बदलांचा परिणाम थेट राशींच्या जीवनावर, करिअरवर आणि नातेसंबंधांवर दिसून येईल.
मुंबई : वैदिक ज्योतिषानुसार सप्टेंबर महिन्यात ग्रहांची मोठी हालचाल होणार आहे. या बदलांचा परिणाम थेट राशींच्या जीवनावर, करिअरवर आणि नातेसंबंधांवर दिसून येईल. सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र हे चार महत्वाचे ग्रह या महिन्यात आपली राशी बदलणार आहेत. त्यामुळे काही राशींना प्रगती, आर्थिक लाभ आणि आनंदाचे क्षण अनुभवता येतील.
13 सप्टेंबर रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ तूळ राशीत प्रवेश करेल. ही रास शुक्राच्या अधिपत्याखाली आहे. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी धन व ऐश्वर्य प्रदान करणारा शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल, तर त्याच दिवशी बुध कन्या राशीत जाईल. पुढे 17 सप्टेंबरला सूर्य देखील कन्या राशीत प्रवेश करेल. या बदलांमुळे बुध आणि सूर्य एकत्र येऊन कन्या राशीत ‘बुधादित्य योग’ तयार करतील. या शक्तिशाली योगामुळे काही राशींना उत्तम फळे मिळणार आहेत. पाहू या त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
advertisement
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना समाधान देणारा ठरू शकतो. चार ग्रहांच्या बदलामुळे व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना अनपेक्षित नफा मिळू शकतो. घरगुती वातावरण आनंदी राहील, कौटुंबिक सलोखा वाढेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील तर विवाहितांच्या जीवनात आनंदाचे क्षण येतील.
धनु राशी
या महिन्यात धनु राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. करिअरशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल, गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांच्या मनातील अस्वस्थता कमी होईल. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होईल. प्रेमसंबंधात स्थैर्य येईल आणि वैवाहिक जीवनात सौख्य वाढेल. आर्थिकदृष्ट्या बचत करण्यास अनुकूल काळ असेल.
advertisement
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना अत्यंत शुभदायक ठरू शकतो. उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. घरगुती जीवनात आनंद व समाधान लाभेल. घर बांधणी, सजावट किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित निर्णय घेण्यासाठी हा काळ योग्य आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील आणि नशिबाची साथ लाभेल. व्यवसायात नवे संधी उपलब्ध होतील, गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळू शकतो. नोकरीत मानसिक शांती मिळेल तसेच सन्मान आणि ओळख वाढेल.
advertisement
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 6:43 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
1 सप्टेंबरपासून गोल्डन टाइम सुरू! या 3 राशींचे आयुष्य बदलणार, मान सन्मानासह बक्कळ पैसा मिळणार