21 ऑगस्टपासून 5 राशींवर दत्तगुरूंची कृपा! नवीन लोक जोडणार,धनलाभ होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astro News : 21 ऑगस्ट हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. या दिवशी ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही अद्वितीय योग तयार होणार आहेत.
मुंबई : 21 ऑगस्ट हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. या दिवशी ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही अद्वितीय योग तयार होणार आहेत. वैदिक पंचांगानुसार, या दिवशी मासिक शिवरात्री आणि गुरु पुष्य योगाचा संयोग होतोय. ज्यामुळे हा दिवस धार्मिकदृष्ट्याही आणि ग्रहस्थितीनुसारही अत्यंत शुभ ठरणार आहे. या संयोगाचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पडणार असून, करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये बदल दिसून येतील.
गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग
पुष्य नक्षत्र हे सर्वश्रेष्ठ नक्षत्र मानले जाते. 21 ऑगस्टला ते गुरुवारी येत असल्याने त्याचे शुभत्व आणखी वाढते. गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस असून, शिवपूजेच्या मासिक शिवरात्रीसह हा संयोग घडत असल्याने विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर, या रात्री 1:25 वाजता शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार असून, 15 सप्टेंबरपर्यंत तो तिथेच राहील. त्यानंतर तो सिंह राशीत प्रवेश करेल. या बदलामुळे अनेक राशींच्या जीवनात मोठे परिवर्तन घडणार आहे.
advertisement
मेष
मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. जुन्या आणि प्रलंबित इच्छांची पूर्तता होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. जमीन-जुमल्यासंबंधित लाभ होऊ शकतो. नोकरीत नवीन संधी मिळतील, तर समाजात मान-सन्मान वाढेल. मात्र वरिष्ठांशी वाद टाळावा, अन्यथा कामात अडथळे येऊ शकतात.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक क्षेत्रात यश मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. संगीत किंवा कला क्षेत्रात विशेष रुची वाढेल. घरात सुख-समाधान राहील आणि शुभकार्यांमध्ये सहभाग घेता येईल. शासन व प्रशासनाशी संबंधित बाबतीतही अनुकूलता मिळेल. यामुळे मानसिक शांती अनुभवता येईल.
advertisement
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक दृष्ट्या फलदायी राहील. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. खूप दिवसांपासून घेतलेली मेहनत फळाला येईल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील आणि जुन्या समस्यांमधून सुटका होईल. कर्ज घेणे किंवा फेडणे यासंबंधी निर्णय घेण्यासाठीही योग्य वेळ आहे. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल.
मकर
मकर राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट महिना प्रगतीचा राहील. अडकलेली कामे गतीमान होतील आणि यश मिळेल. नवीन नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात, तर व्यवसायिक प्रगतीही अपेक्षित आहे. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल.
advertisement
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी रोजगार क्षेत्रात मोठे यश मिळण्याची संधी आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना इच्छित पद मिळण्याची शक्यता आहे. काळ अनुकूल असून सर्व कामे नियोजनानुसार पूर्ण होतील. वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात प्रगतीची वाट खुलेल.
(सदर बातमी फक्त माहितीकरीता असून न्युज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2025 6:33 AM IST