'3' पॉवरफुल मंत्र, जप करताना घ्यावी 'ही' काळजी, 99 टक्के लोक करतात चूक!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारतीय अध्यात्म आणि शास्त्रामध्ये मंत्रांना शब्दांपलीकडची शक्ती मानले जाते. 'मननात् त्रायते इति मंत्र:' म्हणजेच ज्याचे मनन केल्याने रक्षण होते, तो मंत्र. मात्र, हल्ली सोशल मीडिया किंवा पुस्तकातून पाहून मंत्रजप करण्याची फॅशन वाढली आहे.
Mumbai : भारतीय अध्यात्म आणि शास्त्रामध्ये मंत्रांना शब्दांपलीकडची शक्ती मानले जाते. 'मननात् त्रायते इति मंत्र:' म्हणजेच ज्याचे मनन केल्याने रक्षण होते, तो मंत्र. मात्र, हल्ली सोशल मीडिया किंवा पुस्तकातून पाहून मंत्रजप करण्याची फॅशन वाढली आहे. धर्मशास्त्रांनुसार, विशेषतः बीज मंत्रांचा जप कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय किंवा गुरूशिवाय केल्यास त्याचे सकारात्मक ऐवजी नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. मंत्रांची निवड कशी करावी आणि सगुण, निर्गुण व बीज मंत्रांमध्ये नेमका फरक काय, यावर ज्योतिष आणि आध्यात्मिक तज्ज्ञांनी दिलेली ही महत्त्वाची माहिती.
गुरूंचे 'चैतन्य' आणि दीक्षा : गुरू जेव्हा शिष्याला मंत्र देतात, तेव्हा त्या शब्दांमध्ये गुरूंची तपश्चर्या आणि 'चैतन्य' समाविष्ट असते. गुरूशिवाय घेतलेला मंत्र हा केवळ 'अक्षर' असतो, पण गुरूंनी दिलेला मंत्र हा 'सिद्ध' असतो. गुरूशिवाय उच्च तंत्राचे मंत्र म्हटल्याने मानसिक अस्वस्थता किंवा ऊर्जेचा अतिरेक होऊन नुकसान होऊ शकते. गुरूशिवाय एखाद्या कठीण मंत्राचा जप करणे हे निव्वळ नकारात्मकता ओढवून घेण्यासारखे आहे. गुरूशिवाय जर एखादा मंत्र जप तुम्ही करत असाल तर त्याचे परिणाम नेहमीच सकारात्मक होतील असं नाही.
advertisement
बीज मंत्र - अत्यंत शक्तिशाली आणि गुप्त: बीज मंत्र हे एका अक्षराचे असतात, ज्यात त्या देवतेची संपूर्ण शक्ती एकवटलेली असते. हे एखाद्या अणुबॉम्बसारखे शक्तिशाली असतात. उदाहरण: 'ह्रीं', 'श्रीं', 'क्लीं', 'ऐं'.
परिणाम: हे मंत्र थेट आपल्या चक्रांवर आणि ऊर्जेवर परिणाम करतात. गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय यांचा मोठा आकडा जपल्यास डोकेदुखी, चिडचिड किंवा आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.
advertisement
सगुण मंत्र - रूपाची उपासना: ज्या मंत्रात देवतेचे नाव, रूप आणि गुणांचे वर्णन असते, त्यांना सगुण मंत्र म्हणतात. हे मंत्र सर्वसामान्यांसाठी जपण्यास सर्वात सोपे आणि सुरक्षित मानले जातात. उदाहरण: 'ॐ नमः शिवाय', 'ॐ नमो भगवते वासुदेवाय', 'श्री गणेशाय नमः'.
परिणाम: यामुळे एकाग्रता वाढते आणि मनाला शांती मिळते. हे मंत्र जपण्यासाठी कडक दीक्षेची गरज नसते, भक्ती महत्त्वाची असते.
advertisement
निर्गुण मंत्र - निराकार उपासना: निर्गुण मंत्रात कोणत्याही विशिष्ट रूपाची किंवा मूर्तीची पूजा नसते. हे स्वतःला परमात्म्याशी जोडण्याचे किंवा ब्रह्माची अनुभूती घेण्याचे मंत्र आहेत. उदाहरण: 'अहं ब्रह्मास्मि' 'सोहम' 'ॐ'.
परिणाम: हे मंत्र प्रगत साधकांसाठी असतात ज्यांना सांसारिक इच्छांपेक्षा मोक्ष आणि आत्मज्ञानात रस असतो. यासाठी मनाची अवस्था अत्यंत स्थिर असावी लागते.
advertisement
नकारात्मक परिणाम का होतात? चुकीचे उच्चारण किंवा चुकीच्या वेळी मंत्र म्हटल्याने त्या मंत्रातून निर्माण होणारी कंपने तुमच्या शरीरातील उर्जा केंद्रांना धक्का देऊ शकतात. विशेषतः तंत्रोक्त मंत्रांच्या बाबतीत 'उलटा परिणाम' होण्याची भीती असते.
कोणता मंत्र जपणे सर्वात उत्तम? सर्वसामान्यांसाठी आणि ज्यांना अद्याप गुरू लाभले नाहीत, त्यांच्यासाठी 'नामजप' हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. भगवंताचे साधे नाव हे कोणत्याही नियमांशिवाय कोठेही आणि कधीही घेता येते. याला 'नामस्मरण' म्हणतात आणि याचे कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाहीत, उलट यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. जर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर साध्या नामजपाने सुरुवात करा. बीज मंत्रांचा किंवा कठीण स्तोत्रांचा हव्यास धरण्यापूर्वी योग्य गुरूंचा शोध घेणे हिताचे ठरेल.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 4:10 PM IST











