Janmashtami 2025: गोविंदा-गोपाळा..! जन्माष्टमीसाठी आज बाळकृष्णाचा पाळणा या दिशेला लावणं शुभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Janmashtami 2025: जन्माष्टमीला बाळकृष्णाला पाळण्यात घालून झुलवण्याची परंपरा देखील वर्षानुवर्षे चालत आली आहे. जन्माष्टमीची पूजा मोठ्या उत्साहात केली जाते. जन्माष्टमीनिमित्त आज आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि पाळणा..
मुंबई : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बाळकृष्णाची विधिवत पूजा केली जाते. पाळणा सजवला जातो, श्रीकृष्णाचा अभिषेक देखील करतात. या दिवशी बाळकृष्णाला पाळण्यात घालून झुलवण्याची परंपरा देखील वर्षानुवर्षे चालत आली आहे. जन्माष्टमीची पूजा मोठ्या उत्साहात केली जाते. जन्माष्टमीनिमित्त आज आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि पाळणा कोणत्या दिशेला ठेवावा हे सांगणार आहोत.
मूर्ती आणि पाळणा कुठं, कसा स्थापित करावा -
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ प्रसंगी आज आपण ईशान्य दिशेला बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करून त्याच दिशेला पाळणा बांधावा. वास्तुनुसार, ईशान्य दिशा ही देवाचे स्थान मानली जाते. बाळकृष्णाची मूर्ती किंवा फोटो आणि पाळणा या दिशेला ठेवल्यानं घरात सकारात्मकता येते. पाळणा अशा प्रकारे बांधावा की, त्यात ठेवलेल्या बाळकृष्णाचा चेहरा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असेल. लाकडी पाळणा खूप शुभ मानला जातो. परंतु जर लाकडी पाळणा नसेल तर तुम्ही लोखंडी किंवा स्टीलचा देखील वापरू शकता. पाळणा थोडा उंचावर बांधा. बाळकृष्णाचा पाळणा आकर्षक फुलांनी सजवावा. जन्माष्टमीनिमित्त दिवसातून 4 वेळा नैवेद्य अर्पण करा. सामूहिकरित्या पाळणा म्हणणे पूजा करणे शुभ मानले जाते.
advertisement
धार्मिक मान्यतेनुसार, जन्माष्टमीनिमित्त तुम्ही बाळकृष्णाचा पाळणा जितका चांगला सजवाल तितकेच तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील. जन्माष्टमीसाठी बाळकृष्णाला सुंदर कपडे घालावेत, त्यांच्या कपाळावर मोरपंख लावावे. यासोबतच, बाळकृष्णासाठी पलंग म्हणून लाल मखमली कापडाचा वापर करावा. पाळणा आकर्षक फुलांनी सजवावा. पाळण्यात उशी किंवा गादी देखील ठेवावी. शक्य तितका पाळणा सजवावा. त्यामुळे श्रीकृष्णाचा आशीर्वाद अधिक मिळेल. धार्मिक मान्यतेनुसार, जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची योग्य पद्धतीने पूजा केल्यानं पाळणा झुलवून नैवेद्य अर्पण केल्यानं वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि जीवनातील सर्व समस्या दूर होऊ लागतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 15, 2025 8:01 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Janmashtami 2025: गोविंदा-गोपाळा..! जन्माष्टमीसाठी आज बाळकृष्णाचा पाळणा या दिशेला लावणं शुभ