Astrology: ऑक्टोबरच्या शेवटी पुन्हा चोरपंचक! साध्या वाटणाऱ्या या चुका मोठं संकट ओढावतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Panchak Astrology: पंचक दर महिन्याला लागते. परंतु यावर्षी ऑक्टोबर महिन्यात असा योग जुळून येत आहे की यात २ वेळा पंचक लागत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाही पंचक होते आणि आता महिन्याचा शेवटही पंचकाने होत आहे.
मुंबई : ग्रह-नक्षत्रांची एक खास स्थिती तयार झाल्यावर ५ दिवसांचे पंचक लागते. हे ५ दिवस अत्यंत अशुभ मानले जातात, म्हणूनच या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पंचक दर महिन्याला लागते. परंतु यावर्षी ऑक्टोबर महिन्यात असा योग जुळून येत आहे की यात २ वेळा पंचक लागत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाही पंचक होते आणि आता महिन्याचा शेवटही पंचकाने होत आहे. ऑक्टोबर महिन्यातच दसरा-दिवाळी यांसारखे मोठे सणही आले. तसं पाहिल्यास २ वेळा पंचक लागणं शुभ मानलं जाऊ शकत नाही.
एका महिन्यात दोनदा पंचक - द्रिक पंचांगनुसार, ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा ३ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबरपर्यंत पंचक काळ होता. आता दुसऱ्यांदा ३१ ऑक्टोबरपासून पंचक सुरू होत आहेत, ते ४ नोव्हेंबरपर्यंत राहील. दोन्ही वेळा पंचक शुक्रवारच्या दिवशी सुरू होत असल्याने त्यांना 'चोर पंचक' म्हटलं जाईल.
पंचक कधी लागतं?
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र सलग पाच विशेष नक्षत्रांमध्ये - धनिष्ठा, शततारका (शतभिषा), पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती - भ्रमण करतो, तेव्हा त्या कालावधीला पंचक म्हणतात. दर महिन्याला ५ दिवस असे असतात जेव्हा चंद्र या नक्षत्रातून गोचर करतो.
advertisement
तसे पाहता, कोणत्याही पंचकात कोणत्याही प्रकारचे मांगलिक आणि शुभ कार्ये केली जात नाहीत. तसेच, काही इतर कामे देखील वर्जित सांगितली आहेत. परंतु पंचकांमध्ये चोर पंचक, मृत्यू पंचक आणि अग्नी पंचक विशेषतः अशुभ मानली गेली आहेत. या पंचकांदरम्यान केलेली बेपर्वाई गंभीर परिणाम देऊ शकते.
advertisement
चोर पंचकादरम्यान प्रवास करणे टाळावे, विशेषतः दक्षिण दिशेला प्रवास करू नका. याव्यतिरिक्त, आपल्या सामानाचे रक्षण करा. घराच्या सुरक्षिततेत निष्काळजीपणा करू नका. लाकडी वस्तू खरेदी करू नका. याशिवाय पलंग, बिछाना, गादी म्हणजे आरामाशी संबंधित सामान खरेदी करू नका. घराच्या छताचे बांधकाम किंवा पाया घालू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर कोणाचा मृत्यू झाला असेल, तर पंचकाची शांती नक्की करावी.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 3:38 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Astrology: ऑक्टोबरच्या शेवटी पुन्हा चोरपंचक! साध्या वाटणाऱ्या या चुका मोठं संकट ओढावतात


