Diwali Shopping 2025: दिवाळीच्या खरेदीसाठी धनत्रयोदशीपूर्वीचे 10 शुभ दिवस; शाश्वत लाभ मिळतो

Last Updated:

Diwali Shopping 2025: धनत्रयोदशी दिवशी सोनं, चांदी किंवा नवीन वस्तूंची खरेदी केल्यास धन-धान्यात १३ पटीनं वाढ होते आणि भगवान कुबेर व धन्वंतरी यांचा आशीर्वाद राहतो, असं मानलं जातं. विशेष म्हणजे...

News18
News18
मुंबई : यंदा धनत्रयोदशीचा शुभ सण १८ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सोनं, चांदी किंवा नवीन वस्तूंची खरेदी केल्यास धन-धान्यात १३ पटीनं वाढ होते आणि भगवान कुबेर व धन्वंतरी यांचा आशीर्वाद राहतो, असं मानलं जातं. विशेष म्हणजे, या वर्षी दिवाळीपर्यंत धनत्रयोदशी व्यतिरिक्त खरेदीसाठी एकूण १० शुभ मुहूर्त असणार आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार या मुहूर्तांमध्ये खरेदी करण्याचे महत्त्व धनत्रयोदशीइतकेच आहे.
२० ऑक्टोबरपर्यंत अनेक शुभ योग - हिंदू पंचांगानुसार दिवाळीच्या सणापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग, त्रिपुष्कर योग, रवि योग, अमृत सिद्धी योग आणि अभिजीत मुहूर्त असे अनेक शुभ योग तयार होणार आहेत. हे शुभ योगच या तिथींना खास करत आहेत. त्यामुळे जर तुम्ही काही कारणास्तव धनत्रयोदशीला खरेदी करू शकणार नसला तर या शुभ योगांमध्ये खरेदी करू शकता.
advertisement
१४ ऑक्टोबरला पुष्य नक्षत्र - ज्योतिष शास्त्रानुसार एकूण २७ नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांचा राजा मानले जाते. हे नक्षत्र धन, वैभव आणि यशाचे प्रतीक आहे. असे म्हणतात की या नक्षत्रात घर, वाहन, मालमत्ता (प्रॉपर्टी) खरेदी करणे किंवा कोणतीही मोठी गुंतवणूक करणे अत्यंत शुभ असते.
दिवाळीपूर्वी सोने, चांदी, वाहन किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर १४ ऑक्टोबर रोजी पुष्य नक्षत्राच्या शुभ वेळेत खरेदी करू शकता. तसेच, पुष्य नक्षत्रातच माता लक्ष्मीचा जन्म झाला होता अशीही श्रद्धा आहे, त्यामुळे दिवाळी पूजेसाठी लक्ष्मीची मूर्ती या दिवशी खरेदी करणे उत्तम मानले जाते.
advertisement
दिवाळीपूर्वी खरेदीसाठी शुभ तिथी -
खरेदीसाठी खालील काही शुभ तिथी आहेत, ज्या धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी येत आहेत:
मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५: द्विपुष्कर योग
बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५: रवि योग
शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५: सर्वार्थसिद्धि योग
advertisement
शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५: सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृतसिद्धियोग
रविवार, १२ ऑक्टोबर २०२५: रवि योग
मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५: पुष्य नक्षत्र
शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५: सिद्धी राजयोग
शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५: धन त्रयोदशी (धनतेरस)
रविवार, १९ ऑक्टोबर २०२५: अमृत सिद्धी योग
सोमवार, २० ऑक्टोबर २०२५: सर्वार्थ सिद्धी योग
दिवाळीलाही सर्वार्थ सिद्धी योग -
यावर्षी दिवाळीचा सण सर्वार्थ सिद्धी योगात साजरा केला जाईल. त्यामुळे जे लोक दिवाळीच्या दिवशी खरेदी करू इच्छितात, त्यांच्यासाठीही हा काळ उत्तम राहील. सर्वार्थ सिद्धी योगात खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या शुभ मुहूर्तावर केलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे, तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू इच्छित असाल, मालमत्ता खरेदी करू इच्छित असाल किंवा मोठी गुंतवणूक करू इच्छित असाल, तर दिवाळीचा दिवस खूप शुभ आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Diwali Shopping 2025: दिवाळीच्या खरेदीसाठी धनत्रयोदशीपूर्वीचे 10 शुभ दिवस; शाश्वत लाभ मिळतो
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement