Diwali 2025: अमावस्या दोन दिवसांची असली तरी दिवाळी, लक्ष्मीपूजन याच दिवशी; कन्फ्युजन दूर करा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Diwali 2025 : यावर्षी आश्विन अमावस्या दोन दिवस असणार आहे. हिंदू पंचांगानुसार, आश्विन अमावस्या यंदा सोमवार, २० ऑक्टोबर रोजी दुपारी ०३:४५ वाजता सुरू होईल, ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०५:५० वाजेपर्यंत राहील.
मुंबई : मराठी पंचांगानुसार दरवर्षी आश्विन अमावस्येला दीपावलीचा शुभ सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून बंधू लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह अयोध्येला परतले होते, अशी मान्यता आहे. तेव्हा अयोध्यावासीयांनी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नगरी दिव्यांनी सजवली होती. तेव्हापासून दीपावलीचा सण साजरा करण्याची परंपरा चालत आलेली आहे. पण, यंदाच्या दिवाळीच्या तारखेवरून लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. २० ऑक्टोबर, तर कोणी २१ ऑक्टोबर रोजी दिवाळी असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे दिवाळीची नेमकी तिथी कोणती आहे, ते जाणून घेऊया.
दोन दिवस अमावस्या - या वर्षी आश्विन अमावस्या दोन दिवस असणार आहे. हिंदू पंचांगानुसार, आश्विन अमावस्या यंदा सोमवार, २० ऑक्टोबर रोजी दुपारी ०३:४५ वाजता सुरू होईल, ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०५:५० वाजेपर्यंत राहील. दिवाळीचा सण २० ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल, तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाईल.
advertisement
२० ऑक्टोबरलाच दिवाळी का?
ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, आश्विन अमावस्येचा पहिला दिवस प्रदोष आणि निशीथ काळात येत आहे. त्यामुळे सोमवार, २० ऑक्टोबर रोजी दीपावलीचा सण साजरा करणे योग्य ठरेल. दुसऱ्या दिवशी अमावस्या तिथी सूर्यास्तापूर्वीच समाप्त होईल. यामध्ये ना प्रदोष काल असेल ना निशीथ काळ. दीपावलीच्या प्रदोष काळ आणि निशिथा काळामध्येच देवी लक्ष्मीची पूजा करणे योग्य असते. दीपावलीच्या दिवशी निशिथा काळात लक्ष्मीचे आगमन होते, असे शास्त्रात सांगितले आहे.
advertisement
त्यामुळे शास्त्रानुसार केलेल्या गणनेनुसार, प्रदोष काल व्यापिनी तिथी २० ऑक्टोबर, सोमवार रोजी आहे आणि याच दिवशी दिवाळीचा सण साजरा केला जाईल. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार, २१ ऑक्टोबर च्या सकाळी अमावस्येचे स्नान आणि दान होईल. अमावस्या तिथी सूर्यास्तापूर्वी समाप्त होऊन शुक्ल प्रतिपदा तिथी सुरू होईल. या तिथीवर दिवाळीचा सण साजरा केला जात नाही. दीपावलीचे पूजन प्रदोष व्यापिनी अमावस्येवर करणेच योग्य आहे, ती यंदा २० ऑक्टोबरला आहे.
advertisement
यावेळी ५ नव्हे ६ दिवसांचा दीपोत्सव (दीपोत्सव २०२५ तारखा)
शनिवार, १८ ऑक्टोबर: धनत्रयोदशी
रविवार, १९ ऑक्टोबर: दीपदान
सोमवार, २० ऑक्टोबर: दीपावली, नरक चतुर्दशी
मंगळवार, २१ ऑक्टोबर: लक्ष्मी कुबेर पूजन
बुधवार, २२ ऑक्टोबर: दिवाळी पाडवा, गोवर्धन पूजा
गुरुवार, २३ ऑक्टोबर: भाऊबीज
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 4:33 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Diwali 2025: अमावस्या दोन दिवसांची असली तरी दिवाळी, लक्ष्मीपूजन याच दिवशी; कन्फ्युजन दूर करा