Swami Samarth: स्वामी समर्थ भक्तांसाठी आनंदाची बातमी! गुरुपौर्णिमेला अक्कलकोटमध्ये दर्शन वेळांमध्ये बदल
- Published by:Ramesh Patil
- Written by:Pritam Pandit
Last Updated:
Swami Samarth: गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्वामीभक्त अक्कलकोट मध्ये येतात. यापूर्वी पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असायचे. मात्र यंदाच्या वर्षी
सोलापूर : स्वामी समर्थ भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच गुरू पौर्णिमेनिमित्त अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी 22 तास खुले राहणार आहे. वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी याबाबत माहिती दिली. गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्वामीभक्त अक्कलकोट मध्ये येतात. यापूर्वी पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असायचे. मात्र यंदाच्या वर्षी स्वामीभक्तांच्या सोयीसाठी मंदिर पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत सुरू राहणार आहे.
गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर स्वामी भक्तांना दर्शनाची ओढ लागलेली असते, त्यामुळे वटवृक्ष देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. भक्तांच्या दर्शन रांगेसाठी पत्रा शेड उभारण्यात आलेय. यंदाच्या वर्षी स्वामी भक्तांसाठी देवस्थाकडून इतरही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, असेही महेश इंगळे यांनी सांगितले.
गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे. आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असेही म्हटले जाते, कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता. अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले एक पवित्र ठिकाण आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जाते. त्यामुळे गुरुपौर्णिमेला अक्कलकोटमधील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराला भेट देणे आणि स्वामी समर्थांचे दर्शन घेणे याला विशेष महत्त्व आहे.
advertisement
गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्त आपल्या आध्यात्मिक गुरुंचे स्मरण करून त्यांचे पूजन करतात आणि त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात. स्वामी समर्थ हे अनेकांचे गुरु असल्याने त्यांचे भक्त या दिवशी विशेष दर्शनाला अक्कलकोटमध्ये येतात. अक्कलकोटमधील वटवृक्ष मंदिरात स्वामी समर्थांची समाधी असल्यामुळे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे एक विशेष आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. स्वामींचे भक्त त्यांचे दर्शन घेऊन आणि नामस्मरण करून ही ऊर्जा अनुभवतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. गुरुपौर्णिमेला अक्कलकोटमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, भजने, कीर्तने आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. हे वातावरण भक्ती आणि उत्साहाने भारलेले असते. आपल्या गुरुंच्या पूजनाने आणि स्मरणशक्तीने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात, ज्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात आणि सुख-समृद्धी येते अशी भक्तांची श्रद्धा आहे.
view commentsLocation :
Akkalkot,Solapur,Maharashtra
First Published :
July 08, 2025 9:30 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Swami Samarth: स्वामी समर्थ भक्तांसाठी आनंदाची बातमी! गुरुपौर्णिमेला अक्कलकोटमध्ये दर्शन वेळांमध्ये बदल


