Guru Purnima 2025: पितृदोषातून आजच मोकळं व्हा! गुरुपौर्णिमा कुटुंबाला आजारांपासून सुटका देईल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Guru Purnima 2025 : पूर्वजांच्या आत्म्याला शांती नसल्यास त्यांच्यासाठी योग्यरित्या श्राद्ध-विधी न केल्यास हा दोष जन्माला येतो. यामुळे जीवनात अनेक प्रकारची संकटे येतात - म्हणजे अपघात, अचानक पैशाचे नुकसान, मानसिक ताण किंवा कौटुंबिक आजारपण. गुरु पौर्णिमेला पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी
मुंबई : पितृदोषाबद्दल अनेकांच्या मनात भीती असते, वास्तुदोषांप्रमाणेच पितृदोष असल्यास घरात अनेक अडचणी, सतत आजारपण येऊ लागतं. पूर्वजांच्या आत्म्याला शांती नसल्यास त्यांच्यासाठी योग्यरित्या श्राद्ध-विधी न केल्यास हा दोष जन्माला येतो. यामुळे जीवनात अनेक प्रकारची संकटे येतात - म्हणजे अपघात, अचानक पैशाचे नुकसान, मानसिक ताण किंवा कौटुंबिक आजारपण. गुरु पौर्णिमेला पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय करता येऊ शकतात. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.
१. पवित्र नदीत स्नान आणि तर्पण करा
गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदी किंवा तलावात स्नान करावं. तेथे पूर्वजांसाठी तर्पण करा. असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद कुटुंबावर राहतात.
२. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा
पिंपळाचं झाड हे पूर्वजांचे निवासस्थान मानलं जातं. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्याला पाणी अर्पण करा. हा उपाय पितृदोष शांत करण्यास मदत करेल.
advertisement
३. ब्राह्मणांना अन्न आणि दक्षिणा
ब्राह्मणाला खाऊ घालणं हे पितरांना संतुष्ट करण्यासारखं आहे. म्हणून, या दिवशी एखाद्या गरजू ब्राह्मणाला आदराने बोलावून त्याला खाऊ घाला आणि तुमच्या क्षमतेनुसार दक्षिणा द्या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते.
४. दक्षिण दिशेला चारमुखी दिवा लावा
घराची दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते. या दिवशी येथे चारमुखी दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे पितृदोष शांत होतो आणि घरात सकारात्मकता वास करते.
advertisement
५. गरजूंना दान करा
जीवनात दुःखी असलेल्यांना मदत करणे नेहमीच फलदायी मानले गेले आहे. या दिवशी गरजू व्यक्तीला कपडे, धान्य किंवा अन्न दान करा. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात.
६. गाय, कावळ्याला खायला घाला
गायीला भाकरी आणि कावळ्याला भात किंवा स्वयंपाकघरातील काही अन्न दिल्यानं पूर्वजांचे आशीर्वाद कायम राहतात. कावळा हा पूर्वजांचे प्रतीक आहे आणि त्यांच्याद्वारे नैवेद्य किंवा अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते.
advertisement
७. केळीच्या झाडाची पूजा -
यंदा गुरुपौर्णिमा गुरुवारी येत आहे ती भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्यानं भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोष देखील शांत होतो, असे मानले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 10, 2025 8:23 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Guru Purnima 2025: पितृदोषातून आजच मोकळं व्हा! गुरुपौर्णिमा कुटुंबाला आजारांपासून सुटका देईल