Rain Update: म्हाताऱ्या पावसाची कसर आसळका भरून काढणार? 9 ऑगस्टपर्यंत अशी असणार स्थिती

Last Updated:

Rain Update: आसळका हा पारंपरिक मराठी बोलीभाषेतील एक शब्द आहे, तो पावसाच्या एका विशिष्ट टप्प्यासाठी वापरला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार आणि शेतीपरंपरेनुसार, जेव्हा सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा पडणाऱ्या पावसाला 'आसळकाचा पाऊस' असे म्हणतात.

News18
News18
मुंबई : संपूर्ण पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाला ग्रामीण भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. तरणा पाऊस, म्हातारा पाऊस असे म्हटले जाते. सूर्याचं नक्षत्र-वाहन यावरून पावसाच्या जोराचा अंदाज लावला जातो. ऑगस्टनंतर पाऊस ओसरतो, असा आत्तापर्यंतचा अंदाज आहे. सध्या आसळकाचा पाऊस सुरू आहे, असे सांगितले जाते, हा पारंपरिक मराठी बोलीभाषेतील एक शब्द आहे, जो पावसाच्या एका विशिष्ट टप्प्यासाठी वापरला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार आणि शेतीपरंपरेनुसार, जेव्हा सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा पडणाऱ्या पावसाला आसळकाचा पाऊस असे म्हणतात.
आसळकाचा पाऊस म्हणजे काय?
आसळका नक्षत्राचा कालावधी साधारणपणे २६ जुलै ते ९ ऑगस्ट या दरम्यान असतो. या काळात पडणाऱ्या पावसाची काही खास वैशिष्ट्ये सांगितली जातात. हा पाऊस सलग किंवा मुसळधार नसतो. या काळात पाऊस आणि ऊन यांची सारखीच उघडझाप सुरू असते. थोड्या वेळासाठी पाऊस पडतो आणि नंतर लगेच ऊन पडते. म्हणूनच याला आसळका म्हणजे थोडीशी उब असेही म्हटले जाते. आसळकाचा पाऊस हा सुरुवातीच्या जोरदार पावसासारखा नसतो. त्याची धार सौम्य असते आणि तो रिमझिम किंवा संततधार स्वरूपात पडतो.
advertisement
आसळकाचा पाऊस भातशेतीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या काळात भाताच्या पिकांना पाण्याची गरज असते आणि हा पाऊस ती गरज पूर्ण करतो. भात शेती केलेल्या लोकांना आसळकांकडून चांगल्या पावसाची अपेक्षा असते.
पावसाच्या इतर नक्षत्रांशी संबंध -
पारंपरिक शेतीतज्ज्ञांनी प्रत्येक नक्षत्रातील पावसाचे स्वरूप आणि नाव ठरवले आहे. पुनर्वसू नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला तरणा पाऊस म्हणतात, तो पाऊस मुसळधार असतो आणि पेरणीसाठी उपयुक्त असतो. पुष्य नक्षत्राचा पाऊस, यालाच 'म्हातारा पाऊस' असे म्हणतात, तो सुद्धा संततधार असतो. आश्लेषा नक्षत्राचा पाऊस म्हणजेच 'आसळकाचा पाऊस' असे म्हणतात.
advertisement
या पारंपरिक संज्ञा आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात, विशेषतः कोल्हापूर, सांगली, कोकणात पावसाचे स्वरूप आणि शेतीत घ्यावयाची काळजी समजून घेण्यासाठी वापरल्या जातात. शेतकरी आजही तरणा, म्हातारा पावसावरून शेतीच्या कामांचा अंदाज बांधतात. गेल्या काही वर्षांमध्ये आलेले मोठे पूर हे म्हाताऱ्या पावसामध्ये आले आहेत.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Rain Update: म्हाताऱ्या पावसाची कसर आसळका भरून काढणार? 9 ऑगस्टपर्यंत अशी असणार स्थिती
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement