Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला 6 शुभ संयोग जुळलेत, सूर्याचं वाहन माहीत आहे का? भाग्याचा वृद्धी योग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Makar Sankranti 2026 Shubh Sanyog: यंदा मकर संक्रांतीला एकूण 6 शुभ योग जुळून येत असल्याने हा सण अधिक पुण्यकारक मानला जात आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांचे वाहन, अस्त्र, दिशा, भोजन यांना विशेष महत्त्व असते आणि त्याचा प्रभाव सर्वांवर पडतो.
मुंबई : वर्षाती पहिल्या मोठ्या सणाची लोकांना उत्सुकता लागली आहे. जानेवारीत येणारा पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रात. मकर संक्रांत यंदा 15 जानेवारी, गुरुवारी आली आहे. मकर संक्रांत 14 जानेवारीच्या रात्री येत असल्यामुळे संक्रांतीचा पुण्यकाळ 15 जानेवारीला पहाटेपासून दुपारपर्यंत असेल. त्यामुळे मकर संक्रांतीचे स्नान आणि दान 15 जानेवारीलाच केले जाईल. यंदा मकर संक्रांतीला एकूण 6 शुभ योग जुळून येत असल्याने हा सण अधिक पुण्यकारक मानला जात आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांचे वाहन, अस्त्र, दिशा, भोजन यांना विशेष महत्त्व असते आणि त्याचा प्रभाव सर्वांवर पडतो. पंचांगानुसार या शुभ योगांचा काय परिणाम होतो ते पाहूया.
मकर संक्रांतीच्या दिवशी सहा शुभ योग - पहिला वृद्धी योग आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हा योग असल्यामुळे या काळात केलेले स्नान, दान आणि इतर शुभ कार्यांचे पुण्य अधिक वाढते. जे काही चांगले कर्म केले जाईल त्याचे फळ दुपटीने मिळते असे मानले जाते. दुसरा ध्रुव योग आहे. हा योग मकर संक्रांतीच्या रात्री तयार होतो. हा देखील शुभ योग मानला जातो. या काळात पूजा, जप, दान किंवा कोणतेही चांगले कार्य करणे लाभदायक ठरते. तिसरे ज्येष्ठा नक्षत्र आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पूर्ण वेळ ज्येष्ठा नक्षत्र राहील. या नक्षत्राचे स्वामी बुध ग्रह असून देवता इंद्र आहेत. हे नक्षत्र बुद्धी, नेतृत्व आणि सामर्थ्य दर्शवते. मकर संक्रांतीच्या दिवशी ज्यांनी षट्तिला एकादशीचे व्रत केले आहे ते सूर्योदयानंतर स्नान-दान करून पारण करतील. त्यामुळे त्यांना विशेष पुण्य लाभेल. मकर संक्रांती गुरुवारी येत असल्याने या दिवशी भगवान विष्णूंची कृपा मिळते, असे मानले जाते. सूर्यदेवांची पूजा करताना विष्णूंचीही आराधना केल्यास अधिक पुण्य मिळते. मकर संक्रांतीच्या दिवशी माघ महिन्यातील कृष्ण द्वादशी तिथी असते. या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि दान केले जाते. विशेषतः तिळाचे दान केल्याने पितर प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे.
advertisement
यावर्षीच्या मकर संक्रांतीचे नाव मंदाकिनी आहे. या दिवशी सूर्यदेव पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून वाघावर स्वार होतील. त्यांचे उपवाहन घोडा असेल. ते ईशान्य दिशेकडे पाहत पश्चिम दिशेकडे गमन करतील. या दिवशी त्यांचे अस्त्र गदा असून ते भोग अवस्थेत असतील. चांदीच्या भांड्यातील पायस म्हणजेच खीर हे त्यांचे भोजन मानले जाते.
advertisement
या मकर संक्रांतीचा प्रभाव लोकांच्या आरोग्यावर चांगला पडणारा असेल. आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. संक्रांतीनंतर देशोदेशींच्या संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते. सूर्यदेवांच्या कृपेने घराघरात धन-धान्य वाढेल, अशी आशा आहे. सरकारी नोकरी करणारे किंवा सरकारशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी ही संक्रांती शुभ ठरू शकते. मात्र काही लोकांना आपल्या भविष्याबद्दल चिंता वाटू शकते किंवा मनात भीती निर्माण होऊ शकते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 12:11 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला 6 शुभ संयोग जुळलेत, सूर्याचं वाहन माहीत आहे का? भाग्याचा वृद्धी योग











