Wedding Card Tips: लग्न पत्रिकेच्याबाबतीत अनेकजण या चुका करतात; दोन गोष्टींची काळजी घेऊनच छापायला द्या

Last Updated:

Wedding Card Tips: लग्न म्हटलं की, दोन्ही पक्षांच्या घरांमध्ये गडबड गोंधळ पाहायला मिळते. सगळ्या गोष्टी नीट होण्यासाठी घरातील लोक काळजी घेत असतात. लग्नामध्ये लग्न पत्रिका छापणं हा एक महत्त्वाचा विषय असतो. अलिकडे तर लग्न पत्रिका आकर्षक दिसाव्यात यासाठी..

News18
News18
मुंबई : तुळशी विवाह पार पडल्यापासून आता लग्नांचा धूमधडाका सुरू झाला आहे. लग्न म्हटलं की, दोन्ही पक्षांच्या घरांमध्ये गडबड गोंधळ पाहायला मिळते. सगळ्या गोष्टी नीट होण्यासाठी घरातील लोक काळजी घेत असतात. लग्नामध्ये लग्न पत्रिका छापणं हा एक महत्त्वाचा विषय असतो. अलिकडे तर लग्न पत्रिका आकर्षक दिसाव्यात यासाठी खूप शक्कल लढवली जाते. कमी बजेटमध्ये चांगली लग्नपत्रिका छापण्याकडे अनेकांचा कल असतो, पण तसं करताना काही गोष्टींची आपण खबरदारी घ्यायला पाहिजे. आज आपण लग्नपत्रिका छापताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी जाणून घेऊ.
वधू-वरांचा फोटो लग्नपत्रिकेवर घ्यावा?
लग्नपत्रिकेबाबत काही महत्त्वाचे नियम आपण समजून घेतले पाहिजेत. लग्नपत्रिकांवर वधू-वरांचे फोटो छापण्याची अलिकडे जास्त फॅशन झाली आहे. वास्तुनुसार, विचार करता ही प्रथा खूप अशुभ मानली जाते. वधू-वरांना यामुळे दृष्ट लागू शकते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. यासाठी लग्नपत्रिकेवर जोडप्याचा फोटो लावणं टाळावं.
advertisement
गणपतीचा फोटो लावला तर?
अनेक लग्न पत्रिकांवर आपण गणपतीचा फोटो पाहिला असेल. विघ्नहर्ता गणरायाचा लग्न कार्यातील अडचणी दूर करेल, या हेतूनं तसं केलं जातं. परंतु, वास्तवात असं करण्याची गरज नाही. लग्नपत्रिका वाटल्या जातात आणि नंतर काही दिवसांनी लोक त्या कचराकुंडीत टाकतात किंवा जाळूनही टाकतात. यामुळे श्री गणेशाचा अपमान होतो. यासाठीच वास्तुनुसार, पत्रिकांवर गणरायाचा फोटो छापणं टाळा. त्याऐवजी, गणेशाचे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही कार्डमध्ये "श्री गणेशाय नम:" किंवा "शुभ मंगलम" लिहू शकता.
advertisement
छापायला देण्यापूर्वी लग्न पत्रिका नीट पाहा. वास्तुनुसार, लग्नपत्रिका लाल, पिवळ्या, केशरी किंवा पांढऱ्या रंगात छापा. हे रंग शुभ मानले जातात. लग्न पत्रिका कधीही निळ्या, राखाडी, हिरव्या किंवा काळ्या रंगात छापू नका. याचा नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला श्री गणेशाचे आशीर्वाद मिळणार नाहीत.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Wedding Card Tips: लग्न पत्रिकेच्याबाबतीत अनेकजण या चुका करतात; दोन गोष्टींची काळजी घेऊनच छापायला द्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement