Numerology: या जन्मतारखांच्या व्यक्तींनी शक्यतो प्रेमविवाहाऐवजी अॅरेंज्ड मॅरेजला प्राधान्य द्यावं
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Pooja Jain
Last Updated:
Marathi Numerology: वैयक्तिक संबंध किंवा प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर 5 या अंकाच्या ऊर्जेचा अभाव असलेल्या व्यक्ती जोडीदाराचं लक्ष वेधून घेण्यासाठी, रोमान्ससाठी कायम प्रतीक्षेत असतात. या व्यक्तींनी शक्यतो
# अनुपस्थित असलेल्या अंकांचा जीवनावर प्रभाव
#क्रमांक 5 : पाच हा अंक बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो. तो नशिबाचा स्वामी आहे. आपल्या आयुष्याच्या कारच्या ड्रायव्हिंग सीटवर तो असतो. ज्या व्यक्तींकडे 5 या अंकाचा अभाव असतो, त्यांना उद्दिष्टपूर्तीस अडचणी येतात. त्यांच्यात इच्छा कमी असते आणि विविधताही. त्यांना कायमच इतरांकडून प्रेरणा मिळत राहावी लागते. आधी त्यांनी वास्तववादी आणि एकच उद्दिष्ट ठरवावं. नवं उद्दिष्ट ठरवण्यापूर्वी त्यांनी आधीचं उद्दिष्ट पूर्ण करावं.
advertisement
करिअरच्या अनुषंगाने या व्यक्तींना स्थिरता मिळत नाही. करिअरमध्ये चांगली सुरुवात होण्यासाठी 5 या अंकाची आवश्यकता असते. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या समोर जी संधी येते, त्या संधीला हा अंक पाठबळ देतो. प्रोफेशनमध्ये आलेल्या संधींचा वापर करण्यासाठी कायमच अतिरिक्त नशिबाची गरज असते, हे कायम लक्षात ठेवावं.
वैयक्तिक संबंध किंवा प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर 5 या अंकाच्या ऊर्जेचा अभाव असलेल्या व्यक्ती जोडीदाराचं लक्ष वेधून घेण्यासाठी, रोमान्ससाठी कायम प्रतीक्षेत असतात. या व्यक्तींनी शक्यतो प्रेमविवाहाऐवजी अॅरेंज्ड मॅरेजला प्राधान्य द्यावं. 5 हा अंक सुरळीत आणि नशिबवान आयुष्य लाभण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो, हे कायम लक्षात ठेवावं.
advertisement
पाच या अंकाची शुद्ध शक्ती मिळवण्यासाठी उत्तम उपाय
- आश्रमात तांदूळ आणि दूध दान करावं.
- प्रत्येक बुधवारी श्री गणेशाला दूर्वा अर्पण कराव्यात. भगवान शंकराला केशर दुधाचा अभिषेक करावा.
- ऑफिस टेबलवर फाइव्ह स्टेप बांबू प्लांट ठेवावं.
- सकाळच्या वेळेत हिरव्या गवतावर अनवाणी चालावं.
advertisement
- सर्व अंकांची बेरीज 5 येईल असा मोबाइल नंबर ठेवावा.
- बॅगमध्ये कायम पाचमुखी रुद्राक्ष ठेवावा.
- वर्षातून एकदा तरी बुध ग्रहाची पूजा करावी.
- श्रीयंत्र कायम आपल्याजवळ बाळगावं.
- ऑफिसच्या किंवा स्टडी टेबलवर क्रिस्टलचं कमळ ठेवावं.
- नॉन-व्हेज आहार, मद्यपान, तंबाखू खाणं टाळावं. प्राण्यांच्या चामड्याच्या वस्तू वापरू नयेत.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 08, 2023 11:21 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: या जन्मतारखांच्या व्यक्तींनी शक्यतो प्रेमविवाहाऐवजी अॅरेंज्ड मॅरेजला प्राधान्य द्यावं