Numerology: युनिव्हर्सल पार्टनर असतात या मूलांकाचे लोक; पण सगळ्यांशी जुळवून घेणारे असल्यानं...

Last Updated:

Numerology Marathi: हे लोक आपल्या प्रियजनांची खूप काळजी घेतात आणि त्यांच्यावर खूप प्रेम करतात. ते नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात. दोन व्यक्तींमधील किंवा गटांमधील वाद मिटवण्यात ते चांगले मध्यस्थी करतात. त्यांच्यात समजूतदारपणा असतो.

News18
News18
मुंबई : आपल्या आजूबाजूला आपण काही लोक खूप समजूतदार, सगळ्यांशी जुळवून घेणारे असल्याचे पाहिले असेल. मूलांकानुसार प्रत्येकाचा स्वभाव बदलतो. अंकशास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला झालेला असतो त्यांचा मूलांक २ असतो. मूलांक २ चा स्वामी ग्रह चंद्र आहे. चंद्र हा मन, भावना, कल्पनाशक्तीचा कारक आहे. त्यामुळे मूलांक २ असलेल्या व्यक्तींमध्ये चंद्राचे गुणधर्म प्रकर्षाने दिसून येतात.
मूलांक २ असलेल्या व्यक्तींचे गुण:
मूलांक २ असणारे लोक अत्यंत संवेदनशील आणि भावनिक असतात. ते इतरांच्या भावना सहज समजू शकतात आणि इतरांशी सहानुभूती बाळगतात. या लोकांची कल्पनाशक्ती खूप तीव्र असते. ते कला, संगीत, लेखन आणि इतर रचनात्मक कार्यांमध्ये उत्कृष्ट असतात. मूलांक २ असणारे लोक शांत, संयमी आणि मृदुभाषी असतात. वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करतात. इतरांना समजून घेतात, म्हणूनच त्यांना युनिव्हर्सल पार्टनर म्हणून ओळखलं जातं. हे लोक आपल्या प्रियजनांची खूप काळजी घेतात आणि त्यांच्यावर खूप प्रेम करतात. ते नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात. दोन व्यक्तींमधील किंवा गटांमधील वाद मिटवण्यात ते चांगले मध्यस्थी करतात. त्यांच्यात समजूतदारपणा असतो. हो लोक लहान गोष्टींमध्येही समाधान शोधतात आणि सामान्यतः सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात.
advertisement
मूलांक २ असलेल्या व्यक्तींचे दोष:
अति-संवेदनशील आणि भावनिक अस्थिरता त्यांच्यात वाढली तर अडचण होते. त्यांची संवेदनशीलता कधीकधी त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते. या मूलांकाचे लोक लवकर दुखावले जातात आणि त्यांची मनःस्थिती भावनिकदृष्ट्या अस्थिर असू शकते (मूड स्विंग्स). मूलांक २ असलेले लोक निर्णय घेण्यात कधीकधी डगमगतात किंवा दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता असू शकते, ज्यामुळे ते हातची संधी गमावतात. मूलांक २ असणारे लोक काहीसे लाजाळू आणि संकोची असू शकतात, ज्यामुळे त्यांना आपले विचार किंवा भावना मोकळेपणाने व्यक्त करणे कठीण जातं. या लोकांची सतत द्विधा मनस्थिती होते, चंद्राच्या प्रभावामुळे त्यांचे मन अस्थिर राहते. योग्य निर्णय घेण्यात त्यांना वेळ लागतो. इतरांच्या मतांना खूप महत्त्व दिल्यानं ते कधीकधी स्वतःच्या मतांवर ठाम राहू शकत नाहीत आणि इतरांच्या प्रभावाखाली येतात. मानसिक तणाव आणि दबावाला ते लवकर बळी पडू शकतात, ज्यामुळे त्यांना नैराश्य येण्याची शक्यता असते. ते एखाद्या गोष्टीवर जास्त विचार करतात (overthinking) ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
advertisement
एकंदरीत मूलांक २ असलेल्या व्यक्ती अत्यंत भावनिक, संवेदनशील आणि प्रेमळ असतात. ते चांगले मित्र, जोडीदार आणि कुटुंबवत्सल असतात. पण त्यांनी भावनिक अस्थिरता आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेवर काम करण्याची आवश्यकता असते. आपल्यातील गुणांचा योग्य वापर केला आणि दोषांवर नियंत्रण मिळवले, तर ते जीवनात खूप यशस्वी आणि समाधानी होऊ शकतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: युनिव्हर्सल पार्टनर असतात या मूलांकाचे लोक; पण सगळ्यांशी जुळवून घेणारे असल्यानं...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement