Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला केलेले हे उपाय वाया जात नाहीत; कुटुंबाच्या प्रगतीची पायाभरणी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशी ही श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. ही एकादशी विशेषतः संतती प्राप्तीसाठी, विशेषतः पुत्र प्राप्तीसाठी केली जाते, म्हणून तिला पुत्रदा एकादशी असे नाव मिळाले आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि...
मुंबई : एकादशी तिथींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. सध्या मराठी पंचागानुसार श्रावण महिना सुरू आहे. पुत्रदा एकादशी ही श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. ही एकादशी विशेषतः संतती प्राप्तीसाठी, विशेषतः पुत्र प्राप्तीसाठी केली जाते, म्हणून तिला पुत्रदा एकादशी असे नाव मिळाले आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यंदा ५ ऑगस्ट २०२५ मंगळवारी ही एकादशी साजरी होणार आहे.
एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी नेमकं काय करावं -
दशमीच्या रात्री सात्विक भोजन करून ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून हातात पाणी, फूल आणि अक्षता घेऊन 'मी आज पुत्रदा एकादशीचे व्रत करत आहे, तरी माझे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण होवो आणि मला संतती सुख प्राप्त होवो' असा संकल्प करावा.
advertisement
एका पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून श्री हरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. श्रीहरी विष्णूला जल, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), चंदन, तुळशीची पाने, पिवळी फुले आणि पिवळी वस्त्रे अर्पण करावीत. तुळशीचे पान हे विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे ते अवश्य अर्पण करावी. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा.
advertisement
पूजा झाल्यावर पुत्रदा एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी. असे केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते असे मानले जाते. विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू स्तोत्राचे पठण करावे. श्री हरी विष्णूंना सात्विक नैवेद्य अर्पण करावा. यामध्ये दूध, खीर, फळे किंवा मिठाईचा समावेश असावा. या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाणे वर्ज्य मानले जाते.
पुत्रदा एकादशीचे उपाय -
संतती प्राप्तीसाठी काही विशेष उपाय केले जातात, पुत्रदा एकादशीच्या दिवशी गरजूंना किंवा ब्राह्मणांना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करणे खूप शुभ मानले जाते. गायीला हिरवा चारा किंवा गूळ-पोळी खाऊ घालणे लाभदायक मानले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून त्याची पूजा केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतात. संध्याकाळी तुळशीच्या रोपाला दिवा लावून त्याची पूजा केल्यास भगवान विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात. या विधी आणि उपायांनी पुत्रदा एकादशीचे व्रत पूर्ण केल्यास भगवान विष्णूंच्या कृपेने संततीची इच्छा पूर्ण होते, कुटुंबात सुख-शांती येते आणि सर्व कष्ट दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2025 7:33 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला केलेले हे उपाय वाया जात नाहीत; कुटुंबाच्या प्रगतीची पायाभरणी