Rama Ekadashi 2025: 16 की 17 ऑक्टोबरला रमा एकादशी? पाहा योग्य तिथी, पूजेचा शुभ मुहूर्त, मंत्र-आरती-विधी

Last Updated:

Rama Ekadashi 2025: आज आपण आश्विन महिन्यात येणाऱ्या रमा एकादशीविषयी जाणून घेणार आहोत. रमा एकादशीचं व्रत केल्यास आपल्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या वर्षी रमा एकादशीचे व्रत...

News18
News18
मुंबई : सनातन धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी महिन्यातून दोनदा येते. आज आपण आश्विन महिन्यात येणाऱ्या रमा एकादशीविषयी जाणून घेणार आहोत. रमा एकादशीचं व्रत केल्यास आपल्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या वर्षी रमा एकादशीचे व्रत १७ ऑक्टोबर रोजी ठेवले जाईल. विशेष म्हणजे, या वेळी रमा एकादशीला अनेक शुभ योग जुळून येत आहेत, ज्यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळेल. तसेच, त्रिग्रही योगही तयार होत आहे. रमा एकादशीचा शुभ मुहूर्त आणि मंत्र याबाबत अधिक जाणून घेऊ.
रमा एकादशी तिथी २०२५ -
आश्विन कृष्ण एकादशी तिथी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ३४ मिनिटांनी सुरू होत आहे आणि १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून १२ मिनिटांनी तिथी समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार १७ ऑक्टोबर रोजी रमा एकादशीचे व्रत केलं जाणार आहे.
रमा एकादशी २०२५ शुभ मुहूर्त -
advertisement
अभिजीत मुहूर्त – सकाळी ११:४९ पासून दुपारी १२:३५ पर्यंत
अमृत काल – सकाळी ११:२५ पासून दुपारी ०१:०६ पर्यंत
ब्रह्म मुहूर्त – पहाटे ०४:५२ पासून सकाळी ०५:४० पर्यंत
रमा एकादशीला या मंत्रांचा जप करावा -
विष्णू गायत्री मंत्र:
advertisement
ॐ नारायणाय विद्महे।
वासुदेवाय धीमहि।
तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
धन-समृद्धी मंत्र:
ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि ।
ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि ।
विष्णूची आरती :
ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे।
भक्तजनों के संकट क्षण में दूर करे॥
advertisement
जो ध्यावै फल पावै, दुख बिनसे मन का।
सुख-संपत्ति घर आवै, कष्ट मिटे तन का॥ ॐ जय…॥
मात-पिता तुम मेरे, शरण गहूं किसकी।
तुम बिनु और न दूजा, आस करूं जिसकी॥ ॐ जय…॥
तुम पूरन परमात्मा, तुम अंतरयामी॥
पारब्रह्म परेमश्वर, तुम सबके स्वामी॥ ॐ जय…॥
तुम करुणा के सागर तुम पालनकर्ता।
advertisement
मैं मूरख खल कामी, कृपा करो भर्ता॥ ॐ जय…॥
तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति।
किस विधि मिलूं दयामय! तुमको मैं कुमति॥ ॐ जय…॥
दीनबंधु दुखहर्ता, तुम ठाकुर मेरे।
अपने हाथ उठाओ, द्वार पड़ा तेरे॥ ॐ जय…॥
विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा।
श्रद्धा-भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा॥ ॐ जय…॥
advertisement
तन-मन-धन और संपत्ति, सब कुछ है तेरा।
तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा॥ ॐ जय…॥
जगदीश्वरजी की आरती जो कोई नर गावे।
कहत शिवानंद स्वामी, मनवांछित फल पावे॥ ॐ जय…॥
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Rama Ekadashi 2025: 16 की 17 ऑक्टोबरला रमा एकादशी? पाहा योग्य तिथी, पूजेचा शुभ मुहूर्त, मंत्र-आरती-विधी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement