Shani Mantra: प्रत्येक संकटातून मुक्ती, कायमची सुटका; शनिवारी या मंत्रांनी प्रसन्न होतात शनिदेव महाराज
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
ShaniDev: शनिवार शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेवाला कर्मफळ देणारा म्हणून ओळखले जाते. तो सर्व लोकांच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो. वाईट कर्म करणाऱ्यांना तो शिक्षा करतो आणि चांगले करणाऱ्यांना शुभ फळ देतो. कुंडलीत शनिदोष असेल किंवा शनीच्या साडेसाती किंवा अडीचकीचा त्रास असेल तर आजच शनिदेवाची पूजा करा. शनि मंत्रांचा जप करणं लकी मानलं जातं.
मुंबई : शनि पूजेसाठी शनिवारचा दिवस विशेष मानला जातो. हिंदू धर्मात शनिवार हा दिवस शनिदेवांना समर्पित आहे. शनिदेव हे कर्मफळ दाता आणि न्यायाची देवता मानले जातात. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा आणि उपासना केल्यास अनेक फायदे होतात.
शनि दोषापासून मुक्ती: ज्या लोकांच्या कुंडलीत शनिची साडेसाती, अडीचकी किंवा महादशा चालू असेल, त्यांनी या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यास या दोषांचा प्रभाव कमी होतो आणि त्रास कमी होतो. शनिदेव योग्य न्याय देतात. त्यामुळे चांगल्या कर्मांसाठी शनिदेव सुख-समृद्धी, यश आणि वैभव देतात. शनिवार हनुमानाच्या पूजेसाठीही महत्त्वाचा दिवस मानला जातो. हनुमानाची पूजा केल्यानं शनिदेव प्रसन्न होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
शनिदेवांचे प्रभावी मंत्र -
शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणताही मंत्र जपला जाऊ शकतो. शनि मंत्रांचा उच्चार शुभ मानला जातो, त्यानं कामातील अडचणी दूर होतात.
शनि महामंत्र (Shani Mahamantra) -
हा सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे.
ॐ निलान्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम॥
अर्थ: ज्यांचा रंग निळ्या पर्वताप्रमाणे आहे, जे सूर्यपुत्र आहेत, यमाचे मोठे बंधू आहेत, आणि छाया व मार्तंड (सूर्य) यांच्यापासून जन्मलेले आहेत, त्या मंद गतीचे देव श्री शनिदेवाला मी नमस्कार करतो.
advertisement
शनि बीज मंत्र (Shani Beej Mantra) -
हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो.
ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।
हा सर्वात सोपा मंत्र आहे.
ॐ शं शनैश्चराय नमः
शनिवारच्या दिवशी हे मंत्र जपल्याने, तसेच शनिदेवाला तेल (मोहरीचे/तिळाचे) अर्पण केल्याने आणि गरिबांना दान केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 7:03 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shani Mantra: प्रत्येक संकटातून मुक्ती, कायमची सुटका; शनिवारी या मंत्रांनी प्रसन्न होतात शनिदेव महाराज