Pradosh Vrat 2025 Upay: साडेसाती-अडीचकीमधून दिलासा! शनि प्रदोष जुळून आल्यानं शिव-शनिची अशी होईल कृपा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Pradosh Vrat 2025 Upay: प्रदोष व्रताची पूजा प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी केली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर हातात पाणी घेऊन व्रत करण्याचा संकल्प करावा. दिवसभर उपवास (फलाहार) करावा.
मुंबई : प्रदोष व्रत हे भगवान शंकराला समर्पित असते आणि ते दर महिन्याच्या दोन्ही पक्षांतील (शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष) त्रयोदशी तिथीला पाळले जाते. जेव्हा हे प्रदोष व्रत शनिवारी येते, तेव्हा त्याला शनि प्रदोष व्रत म्हणतात. या दिवशी व्रत आणि पूजा केल्यास भगवान शिव आणि शनिदेव या दोघांचीही कृपा प्राप्त होते, ज्यामुळे हे व्रत अधिक प्रभावी मानले जाते. ऑक्टोबर 2025 मधील पहिला शनि प्रदोष व्रत 4 ऑक्टोबर 2025 रोजी आश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी तिथीला आहे.
शनि प्रदोष व्रताला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी महादेवाची पूजा केल्यानं शनिदेवाचे आशीर्वाद देखील मिळतात, कारण शनिदेव हे शंकराचे परम भक्त आहेत. ज्यांच्या कुंडलीत शनिदोष, साडेसाती किंवा अडीचकी सुरू आहे, त्यांना या व्रताचे पालन केल्याने शनीच्या क्रूर दृष्टीतून दिलासा मिळतो. हे व्रत केल्यानं भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मेहनतीचे पूर्ण फळ मिळते. काही धार्मिक ग्रंथांनुसार, पुत्रप्राप्तीच्या इच्छेने देखील हे व्रत केले जाते.
advertisement
शनि प्रदोष व्रताची पूजा आणि विधी -
प्रदोष व्रताची पूजा प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी केली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर हातात पाणी घेऊन व्रत करण्याचा संकल्प करावा. दिवसभर उपवास (फलाहार) करावा.
महादेव पूजा: प्रदोष काळ सुरू झाल्यावर (संध्याकाळी) शिव मंदिरात जावे किंवा घरातच शिवशंकराची पूजा करावी. शिवलिंगावर जल आणि कच्चे दूध अर्पण करावे. त्यानंतर बेलपत्र, धतुरा, भांग, पांढरे चंदन, अक्षता (तांदूळ) आणि फुले अर्पण करावीत. शिव चालिसा आणि भगवान शंकराच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा. शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि निळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. प्रदोष व्रताची कथा आणि शनि प्रदोष व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी.
advertisement
शनिदोष दूर करण्यासाठी दान - शनि प्रदोष व्रताला काळे तीळ आणि मोहरीचे तेल गरजू व्यक्तींना दान करावे. याशिवाय काळे कपडे, ब्लँकेट किंवा लोखंडाच्या वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास शनिदेवाचे शुभ परिणाम लवकर मिळू लागतात. शनिदेवाची पूजा करताना निळ्या रंगाची फुले अर्पण करावीत.
advertisement
शारीरिक किंवा मानसिक समस्यांवर मात करण्यासाठी महादेवाला पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर यांचे मिश्रण) अर्पण करावे. शनि प्रदोष व्रताला शनिदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी शनिदेवाच्या प्रभावशाली मंत्रांचा जप करणे अत्यंत आवश्यक आहे. किमान 108 वेळा या मंत्रांचा जप करावा.
शनिदेवाला प्रसन्न करण्याचा मंत्र:
"ऊँ प्रां प्रीं प्रौं सः शनये नमः"
शनिदोष निवारण मंत्र:
advertisement
"ऊँ शं शनैश्चाराय नमः"
शनिदेवाचे ध्यान मंत्र (श्लोक):
"नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्।"
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 5:09 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Pradosh Vrat 2025 Upay: साडेसाती-अडीचकीमधून दिलासा! शनि प्रदोष जुळून आल्यानं शिव-शनिची अशी होईल कृपा