2026 मध्ये 'या' राशींवर शनीची कडक साडेसाती, कोणकोणत्या अडचणींचा करावा लागणार सामना? वाचा उपाय

Last Updated:

ज्योतिषशास्त्रामध्ये शनी देवाला 'न्यायाधीश' आणि 'कर्माचे फळ देणारा' मानले जाते. जेव्हा शनी एखाद्या राशीच्या बाराव्या, पहिल्या आणि दुसऱ्या भावातून प्रवास करतो, तेव्हा त्या साडेसात वर्षांच्या काळाला 'साडेसाती' म्हटले जाते.

News18
News18
Shani Sadesati Effect And Remedies : ज्योतिषशास्त्रामध्ये शनी देवाला 'न्यायाधीश' आणि 'कर्माचे फळ देणारा' मानले जाते. जेव्हा शनी एखाद्या राशीच्या बाराव्या, पहिल्या आणि दुसऱ्या भावातून प्रवास करतो, तेव्हा त्या साडेसात वर्षांच्या काळाला 'साडेसाती' म्हटले जाते. 2026 मध्ये शनीच्या राशी परिवर्तनामुळे अनेक राशींना साडेसातीतून मुक्ती मिळेल, तर काही राशींसाठी हा काळ आव्हानात्मक असेल.
2026 मध्ये साडेसाती कोणत्या राशींवर आहे?
सध्या शनी मीन राशीत विराजमान आहे. त्यामुळे 2026 मध्ये खालील राशींवर साडेसातीचा प्रभाव राहील
कुंभ : कुंभ राशीवर साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे. हा काळ कष्टाचा असला तरी जाता-जाता शनी काहीतरी चांगले फळ देऊन जातो.
मीन : मीन राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. हा टप्पा सर्वात प्रभावशाली आणि मानसिक ताण देणारा मानला जातो.
advertisement
मेष : मेष राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. यामुळे कामात अडथळे आणि खर्च वाढण्याची शक्यता असते.
साडेसातीचे तीन टप्पे आणि त्यांच्या समस्या
साडेसतीचे तीन टप्पे आहेत, प्रत्येक टप्पा 2.5 वर्षे टिकतो.
पहिला टप्पा
हा टप्पा सर्वात वेदनादायक असतो. आर्थिक नुकसान, नोकरीतील अडथळे, आरोग्य बिघडणे, मानसिक ताण आणि कौटुंबिक कलह अशा समस्या उद्भवतात.
advertisement
व्यक्तीला असे वाटते की सर्व काही त्याच्या विरुद्ध चालले आहे.
दुसरा टप्पा
हा सर्वात कठीण टप्पा आहे. आरोग्य, नातेसंबंध, करिअर आणि आर्थिक परिस्थितीवर याचा सर्वाधिक परिणाम होतो. व्यक्तीला सतत संघर्षांचा सामना करावा लागतो. कधीकधी आरोग्याच्या समस्या गंभीर होतात किंवा मानसिक ताण वाढतो.
तिसरा टप्पा
या टप्प्यात अडचणी कमी होण्यास सुरुवात होते, परंतु आर्थिक आणि कौटुंबिक समस्या कायम राहतात. कठोर परिश्रम शेवटी फळ देतात. एकंदरीत, साडेसातीच्या काळात कर्ज, नोकरी गमावणे, बिघडणारे आरोग्य, कौटुंबिक तणाव, मानसिक अशांतता आणि आत्मविश्वासाचा अभाव यासारख्या समस्या सामान्य असतात.
advertisement
साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी उपाय
हनुमान चालीसा पठण: शनी देव हनुमंताच्या भक्तांना कधीही त्रास देत नाहीत, अशी मान्यता आहे. दररोज किंवा किमान दर शनिवारी 'हनुमान चालीसा' वाचल्याने साडेसातीचा प्रभाव कमी होतो.
शनी मंत्राचा जप: दर शनिवारी 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे मनाला शांती मिळते आणि ग्रहांची प्रतिकूलता कमी होते.
advertisement
पिंपळाच्या झाडाची पूजा: शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. झाडाला सात प्रदक्षिणा घातल्याने शनी दोष दूर होतात.
दानधर्माचे महत्त्व: गरजू आणि गरिबांना काळे कपडे, काळे तीळ, उडदाची डाळ किंवा लोखंडी वस्तू दान कराव्यात. शनिदेवाला 'कर्म' आवडते, त्यामुळे निस्वार्थी सेवा हे सर्वात मोठे दान आहे.
आचरणात शुद्धता: खोटे बोलणे, कोणाची फसवणूक करणे, व्यसन किंवा मांसहार करणे टाळावे. जे लोक प्रामाणिक राहतात, त्यांना शनी कधीच त्रास देत नाही, उलट त्यांना यशाच्या शिखरावर नेतो.
advertisement
शमीच्या झाडाची सेवा: शमीचे झाड शनी देवाला अत्यंत प्रिय आहे. शनिवारी शमीच्या पानांनी महादेवाची पूजा केल्यास किंवा झाडाजवळ दिवा लावल्यास साडेसातीची पीडा कमी होते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
2026 मध्ये 'या' राशींवर शनीची कडक साडेसाती, कोणकोणत्या अडचणींचा करावा लागणार सामना? वाचा उपाय
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement