Shravan 2025: श्रावणात महामृत्युंजय मंत्राचा जप कधी, केव्हा, कसा करायचा? आश्चर्यकारक परिणाम पाहाल

Last Updated:

महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यासाठी श्रावण महिना सर्वात उत्तम मानला जातो. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी या मंत्राचा जप करणे विशेष फलदायी असते. पहाटे ४:०० ते ५:३० या ब्रह्म मुहूर्तावर जप केल्यास त्याचे सर्वाधिक फायदे मिळतात. तसं करणं शक्य नसल्यास

News18
News18
मुंबई : श्रावण महिना सुरू होण्यासाठी आता काही दिवसच बाकी आहेत. श्रावण सोमवारचा उपवास करण्यासह शिवभक्त विविध धार्मिक विधी करतात. श्रावण महिन्यात शंभू-महादेवाची पूजा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. पूजा करताना महादेवाचे मंत्र म्हटले जातात. संपूर्ण श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानं विशेष लाभ होतो, असे मानले जाते. हा मंत्र दीर्घायुष्य, आरोग्य, आणि अकाली मृत्यूपासून संरक्षण देणारा आहे.
असा आहे हा मंत्र:
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
महामृत्युंजय मंत्राचा जप कधी, केव्हा आणि कसा करावा? 
महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यासाठी श्रावण महिना सर्वात उत्तम मानला जातो. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी या मंत्राचा जप करणे विशेष फलदायी असते. पहाटे ४:०० ते ५:३० या ब्रह्म मुहूर्तावर जप केल्यास त्याचे सर्वाधिक फायदे मिळतात. तसं करणं शक्य नसल्यास सकाळी लवकर स्नान झाल्यावर जप करावा. रात्री झोपताना भीती वाटत असल्यास किंवा रात्रीच्या वेळी कोणत्याही संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी जप केला जातो.
advertisement
योग्य विधी आणि नियम (कसा करायचा)
महामृत्युंजय मंत्राचा जप पूर्ण शुद्धता आणि नियमानुसार करणे आवश्यक आहे, तरच त्याचे पूर्ण फळ मिळते. जप करताना जमिनीवर थेट बसू नये. कुश किंवा लोकरीचे आसन वापरावे. मंत्र जपासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे. जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ वापरावी. माळ 'गौमुखी' (माळ ठेवण्यासाठीची पिशवी) मध्ये ठेवणे अधिक शुभ मानले जाते. मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि योग्य असावा. तो मोठ्याने न म्हणता, मंद आवाजात आणि शांत मनाने म्हणावा. मंत्राचा उच्चार स्पष्ट येत नसेल, तर तो आधी चांगल्या प्रकारे शिकून घ्या. जप करण्यासाठी जागा निश्चित करावी. जप करताना एका ठिकाणीच बसून जप पूर्ण करावा. हा मंत्र किमान १०८ वेळा जपला जातो. दररोजच्या जपामध्ये मंत्राची संख्या कमी न करता ती वाढवण्याचा प्रयत्न करावा. जप करताना तुमचे मन एकाग्र असावे. मन इकडे तिकडे भटकू देऊ नये आणि पूर्ण लक्ष मंत्राच्या उच्चारणावर ठेवावे. जप करताना समोर शिवलिंग, भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास, जप करताना शिवलिंगावर दूध किंवा पाणी अर्पण करत राहावे.
advertisement
इतर महत्त्वाचे नियम - महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचा संकल्प घेतल्यास, मांसाहार आणि तामसिक पदार्थ खाणे टाळावे. जप करताना शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ आणि शुद्ध असावे. जप करताना उत्साह आणि सकारात्मक वातावरण ठेवा. आळसात किंवा जांभई देत जप करू नये. महामृत्युंजय मंत्राचा जप केवळ स्वत:साठीच नाही, तर कुटुंबियांसाठी, मित्रांसाठी किंवा गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही केला जाऊ शकतो. श्रद्धेने केलेला जप निश्चितच फलदायी ठरतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: श्रावणात महामृत्युंजय मंत्राचा जप कधी, केव्हा, कसा करायचा? आश्चर्यकारक परिणाम पाहाल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement