Dhanteras 2025: धनत्रयोदशीला कुटुंबाच्या सुख-संपत्तीसाठी खरेदी कराव्या या गोष्टी; फायदे असंख्य

Last Updated:

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर महाराज यांची पूजा केल्यानं खूप लाभ मिळतो. या दिवशी काही खास वस्तू खरेदी करणंही खूप शुभ मानलं जातं. यावर्षी 18 ऑक्टोबर..

News18
News18
मुंबई : आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. याच दिवशी भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते, असे मानले जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर महाराज यांची पूजा केल्यानं खूप लाभ मिळतो. या दिवशी काही खास वस्तू खरेदी करणंही खूप शुभ मानलं जातं. यावर्षी 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाईल. धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू खरेदी केल्यानं तुमचं भाग्य चमकू शकतं, जाणून घेऊया.
लक्ष्मीचा फोटो- दिवाळीच्या शुभप्रसंगी श्री गणेश आणि लक्ष्मीच्या पूजेची परंपरा आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि बुद्धीचे देवता गणेश या दोघांची एकत्रित पूजा केली जाते. धनत्रयोदशीला माता लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती खरेदी करा. लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती वेगवेगळ्या असाव्यात. लक्षात ठेवा की या दिवशी कमळावर विराजमान असलेल्या लक्ष्मीला घरी आणणे उत्तम असते.
advertisement
दक्षिणावर्ती शंख - समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या दक्षिणावर्ती शंखाला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. या शंखाचा ध्वनी अत्यंत मंगलकारी असतो. धनत्रयोदशीला दक्षिणावर्ती शंख खरेदी करा आणि त्याला घरातील देव्हाऱ्यात ठेवा. दिवाळीत त्याची पूजा करणं खूप फलदायी मानलं जातं.
कुबेर यंत्र - धनत्रयोदशीच्या सणाला घरात कुबेर यंत्राची स्थापना करणंही खूप शुभ असतं. या दिवशी कुबेर यंत्र घेऊन या आणि देव्हाऱ्यात स्थापित करा. यामुळे वर्षभर धनलाभ होईल.
advertisement
चांदी - चांदी सुख-समृद्धी देणारी धातू मानली जाते. धनत्रयोदशीला चांदीचे दागिने किंवा चांदीचे नाणे खरेदी करणे शुभ मानले जाते. दिवाळीच्या पूजेत ही वस्तू देवी लक्ष्मीसमोर ठेवली जाते.
गोमती चक्र - गोमती चक्र एक खास प्रकारचा दगड असतो. तो अनेक रंगांचा असतो, पण पांढरा गोमती चक्र सर्वात महत्त्वाचा मानला जातो. तुम्ही तो रत्नासारखा अंगठीत घालू शकता. धनत्रयोदशीला तुम्ही दोन किंवा पाच गोमती चक्रे खरेदी करू शकता. गोमती चक्र दीपावलीच्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण केले जाते.
advertisement
कवडी - कवडी समुद्री जीवांचे कवच आहे. धनाचे प्रतीक म्हणून याचा उपयोग प्राचीन काळापासून होत आला आहे. धनत्रयोदशीला पाच किंवा नऊ कवड्या खरेदी करा. कवडी दीपावलीच्या दिवशी अर्पण केल्यास किंवा पूजेत वापरल्यास आर्थिक आघाडीवर लाभ होतो आणि घरात सुख-शांती टिकून राहते.
advertisement
झाडू - शास्त्रामध्ये झाडूला शुभता आणि संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी त्याची पूजाही करावी. त्यानंतरच त्याचा उपयोग करा.
धणे - धनत्रयोदशीच्या दिवशी अख्खे धणे खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी धणे आणल्यानंतर त्यांना पूजा स्थानी ठेवावे. यामुळे भगवान कुबेर आणि धन्वंतरी प्रसन्न होतात, असे म्हणतात. दिवाळीनंतर सकाळी हे धणे कुंडीत (गमल्यात) लावावे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला कुटुंबाच्या सुख-संपत्तीसाठी खरेदी कराव्या या गोष्टी; फायदे असंख्य
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement