Tulsi Puja Tips: दिवाळीत तुळशीजवळ लावण्याच्या दिव्याचे नियम ध्यानात ठेवा; कोणत्या गोष्टी अशुभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi Deepak Bujhna Ashubh: तुळशी माता घराची समृद्धी, आरोग्य आणि शुद्ध वातावरणाचे प्रतीक मानली जाते. तुळशीजवळ दररोज संध्याकाळी तूप किंवा तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवी लक्ष्मीची कृपा घरात कायम राहते. पण जर...
मुंबई : प्रत्येक हिंदू घरात तुळशीचं रोप श्रद्धा आणि आस्थेचं प्रतीक मानलं जाते. सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावणं हा जणू एका परंपरेचा भाग आहे. घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्याचे काम त्यामुळं सोपं होतं. पण काहीवेळा असे होते की, तुळशीजवळ लावलेला दिवा अचानक विझतो. अशावेळी अनेक लोकांना असा विचार पडतो की हे एखाद्या अशुभ संकतेच प्रतीक आहे की फक्त हवा किंवा इतर एखाद्या सामान्य कारणामुळे असे झाले आहे. या लेखात आपण तुळशीजवळ दिवा विझण्याचा नेमका अर्थ काय होतो, यामागे कोणत्या धार्मिक मान्यता आहेत आणि घरातील सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी काय उपाय करावे लागतील, हे समजून घेणार आहोत. याबद्दल ज्योतिषाचार्य अंशुल त्रिपाठी माहिती देत आहेत.
तुळशी माता घराची समृद्धी, आरोग्य आणि शुद्ध वातावरणाचे प्रतीक मानली जाते. तुळशीजवळ दररोज संध्याकाळी तूप किंवा तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवी लक्ष्मीची कृपा घरात कायम राहते. पण जर दिवा आपोआप विझला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. धार्मिक मान्यतेनुसार, हा अशुभ संकेत मानला जातो.
advertisement
दिवा वाऱ्यामुळे नव्हे, तर आपोआप विझला, तर तुळशी माता कोणत्या तरी कारणामुळे नाराज असू शकते याचा संकेत असू शकतो. कदाचित तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे सेवा केली नसेल, जसे की सकाळी पाणी न देणे, रोपट्याजवळ घाण ठेवणे किंवा दिव्यात तेलाची कमतरता ठेवणे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून या छोट्या गोष्टींना खूप महत्त्व आहे.
कधीकधी दिवा विझण्यामागे पूर्णपणे वैज्ञानिक कारणे देखील असू शकतात, जसे की वाऱ्याचा झोका, तूप किंवा तेलाची कमी मात्रा किंवा वात ओल्यापणामुळे भिजणे. म्हणून, प्रथम कारण समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यानुसार सुधारणा करावी.
advertisement
जर दिवा वारंवार विझत असेल, तर काही सोपे उपाय केले जाऊ शकतात. सर्वात आधी तुळशीच्या रोपट्याभोवती स्वच्छता राखा आणि रोज सकाळ-संध्याकाळ पाणी अवश्य अर्पण करा. दिवा लावताना पूर्ण श्रद्धा ठेवा आणि दिव्यात पुरेसे तेल किंवा तूप आहे आणि वात व्यवस्थित लावली आहे, याची खात्री करा. शक्य असल्यास, काचेचे झाकण असलेल्या दीपदानाचा वापर करा, ज्यामुळे हवा लागण्याची शक्यता कमी होईल.
advertisement
याव्यतिरिक्त, सोमवार आणि गुरुवार या दिवशी तुळशी मातेची विशेष पूजा करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही तुळशीजवळ दिवा लावण्यापूर्वी भगवान विष्णूचे ध्यान करा आणि तुळशी मातेकडे घराच्या शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. असे केल्याने केवळ अशुभता दूर होते असे नाही, तर घरातील वातावरणही सकारात्मक राहते, असे मानले जाते. जर दिवा चुकून विझला, तर घाबरण्याची किंवा भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त शांत मनाने पुन्हा दिवा लावा, थोडी प्रार्थना करा आणि तुळशीजवळ एक ताजे फूल अर्पण करा. असे केल्याने नकारात्मकता संपते आणि सकारात्मक ऊर्जा पुन्हा मिळते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 8:37 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Tulsi Puja Tips: दिवाळीत तुळशीजवळ लावण्याच्या दिव्याचे नियम ध्यानात ठेवा; कोणत्या गोष्टी अशुभ