Tulsi Puja Niyam: नित्य तुळशीची विधीपूर्वक पूजा 'अशी' करावी; जल अर्पण करताना या पूजा मंत्राचा जप शुभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi Puja Niyam: दररोज तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घराचे वातावरण शुद्ध होते. शास्त्रांमध्ये तुळशी पूजेसाठी काही विशेष नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्याने पूर्ण लाभ मिळतो. तुळशी पूजेचे योग्य नियम जाणून घेऊया.
मुंबई : हिंदू धर्मात तुळशीचे रोप पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप असल्याचे म्हटले जाते, भगवान विष्णूंना तुळशी खूप प्रिय आहे. धार्मिक मान्यतेनुसार, दररोज देवी-देवतांसह तुळशीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. दररोज तुळशीजवळ दिवा लावल्यानं नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घराचे वातावरण शुद्ध होते. शास्त्रांमध्ये तुळशी पूजेसाठी काही विशेष नियम सांगितले आहेत, त्यामुळे पूजेचे पूर्ण लाभ मिळतात. तुळशी पूजेचे योग्य नियम जाणून घेऊया.
तुळशी पूजेचे नियम - तुळशीची पूजा करण्यापूर्वी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. तुळशीची पूजा सुरू करण्यापूर्वी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. कारण तुळशीमातेला भगवान विष्णूची पत्नी म्हणून पूजले जाते. यानंतर, तुळशीला लाल रंगाचा चुनरी अर्पण करावी. नंतर फुलांचा हार अर्पण करा. तुळशीजवळ देशी तुपाचा दिवा लावा. प्रदोष काळात किंवा संध्याकाळच्या वेळी हा दिवा लावणे विशेषतः फलदायी मानले जाते. दिवा लावल्यानंतर तुळशीमातेची आरती करा. यानंतर, तुम्ही तुळशी चालीसा किंवा तुळशी मंत्रांचा जप करावा. पूजेनंतर तुळशीला मिठाई किंवा फळे अर्पण करा आणि नंतर तो कुटुंब आणि जवळच्या लोकांना प्रसाद म्हणून वाटून द्या.
advertisement
तुळशीची आरती -
जय जय तुलसी माता, सबकी सुखदाता वर माता।
सब योगों के ऊपर, सब रोगों के ऊपर,
रुज से रक्षा करके भव त्राता।
जय जय तुलसी माता…
बहु पुत्री है श्यामा, सूर वल्ली है ग्राम्या,
विष्णु प्रिय जो तुमको सेवे, सो नर तर जाता।
जय जय तुलसी माता…
हरि के शीश विराजत त्रिभुवन से हो वंदित,
advertisement
पतित जनों की तारिणि, तुम हो विख्याता।
जय जय तुलसी माता…
लेकर जन्म बिजन में आई दिव्य भवन में,
मानव लोक तुम्हीं से सुख सम्पत्ति पाता।
जय जय तुलसी माता…
हरि को तुम अति प्यारी श्याम वर्ण सुकुमारी,
प्रेम अजब है श्री हरि का तुम से नाता।
जय जय तुलसी माता…
advertisement
तुळशी पूजन मंत्र -
तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुलसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।
तुळशी स्तुति मंत्र -
देवी त्वं निर्मिता पूर्वमर्चितासि मुनीश्वरैः
नमो नमस्ते तुलसी पापं हर हरिप्रिये।।
advertisement
तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुलसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 17, 2025 8:57 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Tulsi Puja Niyam: नित्य तुळशीची विधीपूर्वक पूजा 'अशी' करावी; जल अर्पण करताना या पूजा मंत्राचा जप शुभ