Vastu Tips: घरात-बाल्कनीत या 6 प्रकारची झाडं लावणं लकी; पैसा खेचून आणतात, कामात नशिबाची साथ

Last Updated:

Lucky plants for home: वास्तुशास्त्रानुसार घरात काही झाडे-रोपे लावल्यानं घराचे वातावरण आनंदी राहतेच, शिवाय संपत्ती, समृद्धी आणि प्रगती देखील होते. ही झाडं घरात सकारात्मक उर्जा वाढवतात.

News18
News18
मुंबई : कौटुंबिक जीवनात प्रत्येकालाच घरी आनंद, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा असावी, असे वाटते. घराची रचना करताना यासाठीच लोक वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करतात. वास्तुशास्त्र सर्व गोष्टी करण्याकडे लोकांचा कल आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात काही झाडे-रोपे लावल्यानं घराचे वातावरण आनंदी राहतेच, शिवाय संपत्ती, समृद्धी आणि प्रगती देखील होते. ही झाडं घरात सकारात्मक उर्जा वाढवतात. जर ती योग्य दिशेने आणि पद्धतीने लावली तर ती जीवनात आश्चर्यकारक बदल घडवून आणू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा 6 शुभ वनस्पतींबद्दल सांगणार आहोत. याबद्दल वास्तुशास्त्र तज्ज्ञ रवी पराशर यांनी माहिती दिली आहे.
तुळशीचे रोप - हिंदू धर्मात तुळशीला सर्वात पवित्र वनस्पतींपैकी एक मानले जाते. धार्मिक महत्त्वासोबत आरोग्य आणि पर्यावरणासाठी देखील खूप फायदेशीर आहे. वास्तुनुसार, तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा ठेवतं. घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला ते लावणं शुभ मानलं जातं. तुळशीची पूजा करून सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्याने घरात शांती आणि समृद्धी राहते.
advertisement
मनी प्लांट - मनी प्लांट हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मनी प्लांटला घरात लावल्याने आर्थिक समृद्धी येते असं मानलं जातं. हे झाड घराच्या आत किंवा बाहेर कुठेही लावता येतं. मनी प्लांटमुळे घरातला तणाव कमी होतो आणि सुख-समृद्धी वाढते. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या आग्नेय कोपऱ्यात मनी प्लांट लावावा, कारण ही दिशा संपत्तीच्या वाढीशी आणि आर्थिक स्थिरतेशी संबंधित आहे.
advertisement
बांबू प्लांट - वास्तू आणि फेंगशुई दोन्हीमध्ये बांबू प्लांटला नशीब, दीर्घायुष्य आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यानं आनंद आणि शांती राहते आणि व्यवसायातही प्रगती होते. वास्तुनुसार, ते घराच्या पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवणे सर्वात शुभ  मानले जाते. ही वनस्पती दीर्घकाळ हिरवी राहते आणि कमी काळजी घेतल्यासही सहज वाढते.
advertisement
मोगरा - मोगरा फुलांचा सुगंध मनाला त्वरित शांती आणि विश्रांती देतो. वास्तुशास्त्रानुसार, मोगरा वनस्पती घरात प्रेम, सुसंवाद आणि सकारात्मक वातावरण आणते. मोगरा अंगणात, बाल्कनीत किंवा अशा ठिकाणी लावावे जिथे त्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरेल.
झेंडू वनस्पती - झेंडूच्या फुलांना पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे, ते उत्साहाचे प्रतीक मानले जाते. वास्तुनुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा बागेत झेंडूचे रोप लावणे खूप शुभ आहे. त्याच्या चमकदार पिवळ्या आणि नारंगी कळ्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. तसेच, ही वनस्पती घराचे वातावरण चैतन्यशील आणि आकर्षक बनवते.
advertisement
पीस लिली - पीस लिली वनस्पती घरात शांतता राखण्यासाठी ओळखली जाते. पीस लिली घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करते आणि तणाव कमी होतो. वास्तुशास्त्रानुसार, पीस लिली बैठकीच्या खोलीत किंवा बेडरूममध्ये ठेवणे चांगले. त्याची हिरवी पाने आणि पांढरी फुले घराचे सौंदर्य वाढवतात आणि वातावरण शांत करतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: घरात-बाल्कनीत या 6 प्रकारची झाडं लावणं लकी; पैसा खेचून आणतात, कामात नशिबाची साथ
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement