Vastu Tips: परिणाम कसा दिसेल? मनी प्लांट घरात या ठिकाणी ठेवला असेल तरच हेतू होईल साध्य
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: मनी प्लांटला वास्तुशास्त्रा विशेष महत्त्व आहे. ते आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतं आणि आर्थिक समृद्धीसाठी शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट योग्य दिशेला ठेवल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात, असं मानलं जातं.
मुंबई : वास्तुशास्त्रानुसार घरातील कुंड्यांमध्ये विविध प्रकारची रोपं-झाडं लावली जातात. घरात लावण्याच्या रोपांमध्ये सर्वात प्रसिद्ध असलेलं रोप म्हणजे मनी प्लांट. याला पैशाचं झाड असंही म्हणतात. मनी प्लांटला वास्तुशास्त्रा विशेष महत्त्व आहे. ते आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतं आणि आर्थिक समृद्धीसाठी शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट योग्य दिशेला ठेवल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात, असं मानलं जातं. मनी प्लांट योग्य दिशेला ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा त्याचे चांगले परिणाम मिळू शकणार नाहीत.
आग्नेय दिशा (दक्षिण-पूर्व): ही दिशा मनी प्लांटसाठी सर्वात शुभ मानली जाते. या दिशेवर गणपती आणि शुक्र ग्रहाचे आधिपत्य असते. या दिशेला मनी प्लांट ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि धन-समृद्धी वाढते.
पूर्व दिशा: ही दिशा टाळणे चांगले. पूर्व दिशेला मनी प्लांट ठेवल्यास घरात वाद आणि मतभेद वाढू शकतात.
ईशान्य दिशा (उत्तर-पूर्व): ही दिशा देखील मनी प्लांट ठेवण्यासाठी योग्य नाही. या दिशेला ठेवल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. वायव्य दिशेला मनी प्लांट ठेवल्याने आर्थिक व्यवहार बिघडू शकतात.
advertisement
मनी प्लांट ठेवण्याचे नियम -
वेल जमिनीवर पसरू देऊ नका: मनी प्लांटच्या वेली जमिनीवर पसरू नयेत. त्या दोरीच्या किंवा काठीच्या मदतीने वर चढवाव्यात. वेली खाली पसरल्या तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे आर्थिक प्रगती थांबते.
पाने सुकलेली नसावीत: मनी प्लांटची पाने पिवळी किंवा सुकलेली दिसल्यास लगेच ती काढा. सुकलेली पाने घरात नकारात्मकता आणतात. शक्य असल्यास मनी प्लांटची कुंडी हिरव्या किंवा निळ्या रंगाची असावी, जेणेकरून सकारात्मकता टिकून राहते.
advertisement
घराबाहेर ठेवू नका: मनी प्लांट घराच्या आत ठेवणे शुभ मानले जाते, खासकरून लिव्हिंग रूममध्ये किंवा कार्यालयात. ते घराबाहेर लावल्यास त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो.
मनी प्लांटचे फायदे - मनी प्लांटचे रोप हवा शुद्ध करते, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. मनी प्लांट मानसिक ताण कमी करण्यास मदत करते. घरात योग्य दिशेला ठेवल्यास घरात सुख-शांती आणि समृद्धी येते.
advertisement
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 4:44 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: परिणाम कसा दिसेल? मनी प्लांट घरात या ठिकाणी ठेवला असेल तरच हेतू होईल साध्य