Vastu Tips: घरात दक्षिण दिशेलाच असावेत या प्रकारचे फोटो-पेंटिग्स; इतक्या गोष्टींवर दिसतो चांगला परिणाम
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips: दक्षिण दिशा ही यम-पितृदेव आणि मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली असते, त्यामुळे या दिशेचा वापर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेच्या भिंतीवर काही विशिष्ट प्रकारचे फोटो लावणे शुभ मानले जाते.
मुंबई : आपण घरात विविध प्रकारचे फोटो-पेंटिग्स लावत असतो. पण, घराच्या दक्षिण दिशेला काही प्रकारचे फोटो लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा राहते, कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या प्रत्येक दिशेचे स्वतःचे असे महत्त्व आहे. दक्षिण दिशा ही यम-पितृदेव आणि मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली असते, त्यामुळे या दिशेचा वापर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेच्या भिंतीवर काही विशिष्ट प्रकारचे फोटो लावणे शुभ मानले जाते. दक्षिण दिशा ही स्थिरता, प्रसिद्धी आणि यश दर्शवते. त्यामुळे या दिशेच्या भिंतीवर असे फोटो लावावेत जे ऊर्जा आणि सकारात्मकता वाढवतात.
advertisement
पूर्वजांचे फोटो: दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेच्या भिंतीवर पूर्वजांचे किंवा दिवंगत कुटुंबातील लोकांचे फोटो लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात पितरांचा आशीर्वाद राहतो आणि शांतता टिकून राहते.
पर्वतांचे फोटो: पर्वत स्थिरता आणि शक्तीचे प्रतीक आहेत. दक्षिण दिशेच्या भिंतीवर डोंगरांचे किंवा पर्वतांचे फोटो लावल्याने घरात स्थिरता येते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये धैर्य वाढते, असे मानले जाते.
advertisement
लाल किंवा नारंगी रंगाचे चित्र: अग्नी तत्व दर्शवणारे लाल, नारंगी आणि तपकिरी रंगाचे चित्र किंवा पेंटिंग्ज लावणे फायदेशीर ठरते. हे रंग ऊर्जा आणि उत्साह वाढवतात. तसेच कामाच्या ठिकाणी किंवा घरात तुम्ही व्यावसायिक यश दर्शवणारे फोटो लावू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या कंपनीच्या लोगोचे किंवा यशाचे प्रतीक असणारे चित्र लावू शकता. बेडरुमची भिंत दक्षिणेकडील असेल, तर त्यावर पती-पत्नीचा आनंदी फोटो लावणे चांगले मानले जाते. यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतात.
advertisement
दक्षिण दिशेला कोणते फोटो लावू नये?
वास्तुशास्त्रानुसार, काही विशिष्ट प्रकारचे फोटो दक्षिणेकडील भिंतीवर लावणे अशुभ मानले जाते. जल तत्वाचे फोटो जसे की, धबधबा, नदी, किंवा समुद्राचे चित्र दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावू नये. कारण, पाणी आणि अग्नी (दक्षिण दिशा) ही परस्परविरोधी तत्वे आहेत. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणत्याही देव-देवतांचे फोटो किंवा मूर्ती दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावू नये. उदास किंवा नकारात्मक भावना व्यक्त करणारे चित्र लावणे टाळावे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
advertisement
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2025 6:15 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: घरात दक्षिण दिशेलाच असावेत या प्रकारचे फोटो-पेंटिग्स; इतक्या गोष्टींवर दिसतो चांगला परिणाम