Mumbai: 252 किमीचा स्पीड, वांद्रे वरळी सी लिंकवर लॅम्बोर्गिनी पळवली, पोलिसांनी 5 कोटींची कार केली जप्त

Last Updated:

वांद्रे वरळी सी लिंकवर तब्बल 252 किमी वेगाने लॅम्बोर्गिनी ऊरस lamborghini urus चालवण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

News18
News18
मुंबई: मुंबईमध्ये भरधाव वेगात गाडी चालवून अपघाताच्या घटना वारंवार घडत असतात. अशातच मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. वांद्रे वरळी सी लिंकवर तब्बल 252 किमी वेगाने लॅम्बोर्गिनी ऊरस lamborghini urus चालवण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून लम्बोर्गिनी कार जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी वरळी सी लिंकवर ही घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे. पिवळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी lamborghini urus ही एसयूव्ही एका चालकाने तब्बल 251 किमी वेगाने चालवली. खरंतर वांद्रे वरळी सी लिंकवर वेग मर्यादाही 80 किमी आहे. पण, असं असतानाही लॅम्बोर्गिनी चालकाने तब्बल 251 किमी वेगाने कार चालवली. एवढंच नाहीतर 251 किमीचा वेग गाठत असताना व्हिडीओ सुद्धा रेकॉर्ड करून इंन्साटाग्रामवर व्हायरल करण्यात आला.
advertisement
advertisement
पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेऊन तपास केली असता लॅम्बोर्गिनीचा चालक सापडला. वरळी पोलिसांनी मुंबईतील खार पश्चिम भागातून अदनवाला नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला.  ही लम्बोर्गिनी ऊरस lamborghini urus जप्त करण्यात आली आहे. ही गाडी हरियाणाची पासिंग असून  HR 70 F 1945 असा कारचा क्रमांक आहे.
ही  लॅम्बोर्गिनी सुपर वेल कॉमट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर रजिस्ट्रर आहे.  ही कार अहमदाबाद येथील रहिवासी असलेल्या नीरव पटेल यांच्या मालकीची आहे. नीरव पटेल यांनी ही गाडी कार डिलर असलेल्या अदनवालाला दिली होती. पण, या पठ्याने वांद्रे वरळी सी लिंकवर 251 किमी वेगात पळवून पराक्रम केला आहे. पोलिसांनी ही लम्बोर्गिनी जप्त केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे. 
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Mumbai: 252 किमीचा स्पीड, वांद्रे वरळी सी लिंकवर लॅम्बोर्गिनी पळवली, पोलिसांनी 5 कोटींची कार केली जप्त
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement