1 मेपासून देशात सॅटेलाइट बेस्ड टोल सिस्टम लागू होणार का? पहा सरकारचं उत्तर काय
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Satellite Based Tolling System: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने उपग्रह-आधारित टोल प्रणाली लागू करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यासोबतच, सरकारने माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांचे खंडन केले आहे.
नवी दिल्ली : 1 मे पासून देशभरात उपग्रह-आधारित टोल प्रणाली लागू करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 1 मे 2025 पासून उपग्रह-आधारित टोल प्रणाली सुरू केली जाईल आणि ती सध्याच्या फास्टॅग-आधारित टोल संकलन प्रणालीची जागा घेईल. असा दावा करणाऱ्या माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानंतर मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे.
टोल प्लाझांमधून वाहनांची अखंड, अडथळामुक्त हालचाल सक्षम करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी निवडक टोल प्लाझांवर 'ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR)-FASTag-आधारित बॅरियर-फ्री टोलिंग सिस्टम' तैनात केली जाईल, असे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
निवेदनानुसार, प्रगत टोल प्रणालीमध्ये ANPR तंत्रज्ञानाचा समावेश असेल. जे वाहनांच्या नंबर प्लेट वाचून त्यांची ओळख पटवेल आणि टोल कपातीसाठी रेडिओ-फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) वापरणारी विद्यमान 'FASTag प्रणाली' यांचा समावेश असेल.
advertisement
याअंतर्गत, वाहनांना त्यांच्या टोल प्लाझावर न थांबता उच्च-कार्यक्षमता असलेल्या एएनपीआर कॅमेरा आणि फास्टॅग रीडरद्वारे ओळखपत्राच्या आधारे टोल आकारला जाईल. नियमांचे पालन न केल्यास, उल्लंघन करणाऱ्यांना ई-नोटीस जारी केली जाईल, ज्याची रक्कम न भरल्यास फास्टॅग निलंबित केला जाऊ शकतो आणि 'वाहनाशी' संबंधित इतर दंड लावला जाऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 18, 2025 4:31 PM IST