Royal Enfield करणार लवकरच धमाका, आणतेय आजपर्यंत कधी न पाहिलेली BIKE
- Published by:sachin Salve
Last Updated:
लीकडे रॉयल एनफिल्डने ६५० सीसी सेगमेंटमध्ये बाइक लाँच केली. आता रॉयल एनफिल्ड आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे.
मुंबई: बुलेट म्हटल्यावर रॉयल एनफील्डचं नाव हमखास घेतलं जाईल. मागील काही वर्षांपासून रॉयल एनफिल्डने अनेक छोटे मोठे बदल आपल्या बाइकमध्ये केले आहे. अलीकडे रॉयल एनफिल्डने ६५० सीसी सेगमेंटमध्ये बाइक लाँच केली. आता रॉयल एनफिल्ड आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. लवकरच रॉयल एनफिल्डही नवीन ७५० सीसी इंजिनची बाईक आणणार आहे या बाइकचं कामही सुरू झालं आहे. आधी अशी अपेक्षा होती की नवीन इंजिन नवीन हिमालयीनसह येईल. पण आता, हिमालयन ही या इंजिनसह पदार्पण करणारी पहिली बाईक नसेल! भारतात येणारी RE 750cc बाईक असू शकते.
750 CC इंजिन या बाइकमध्ये असेल!
जर ती हिमालय नसेल तर तो इंटरसेप्टर असेल का? नाही, उलट नवीन रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल जीटी-आर ही या नवीन ७५० सीसी इंजिनसह पदार्पण करणारी पहिली बाईक असणार आहे. नवीन कॉन्टिनेंटल जीटी-आरमध्ये या नवीन इंजिन व्यतिरिक्त संपूर्ण कॅफे रेसर डिझाइन असेल. आतापर्यंत, या नवीन इंजिन आणि त्याच्या पॉवर आउटपुटबद्दल कोणतीही महत्त्वाची माहिती समोर आलेली नाही. पण, मोठ्या क्षमतेचं इंजिन असल्याने, ते सध्याच्या 650cc इंजिनपेक्षा जास्त दमदार असणार यात शंका नाही.
advertisement
भारतात कधी होईल लाँच?
भारतात सध्या 650 सीसी सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्ड एकमेव बाईक उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे आता लवकरच ७५० सीसी बाईकची भारतीय रस्त्यांवर चाचणी करताना दिसणार आहे. मोठ्या क्षमतेचे इंजिन आणि कॅफे रेसर डिझाइनसह, नवीन मॉडेल सध्याच्या GT 650 मॉडेलपेक्षा जड आणि वेगवान असेल. ही नवीन बाईक भारतात कधी लाँच होईल हे अद्याप कंपनीने स्पष्ट केलं नाही. पण हे नवीन मॉडेल २०२६ च्या अखेरीस, म्हणजेच एप्रिल २०२६ च्या आधी सादर होईल.
advertisement
पण असं असलं तरी लाँचिंगला विलंब होऊ शकतो. तसंच, जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी रॉयल एनफिल्डला हे नवीन मॉडेल योग्यरित्या वेगळ्या उंचीवर ठेवावं लागेल. कारण ७५० सीसी लाँच झाल्यानंतर नवीन रायडर्स दुर्लक्षित करतात तर अनुभवी रायडर्स हे इतर कंपन्यांना पसंत देतात.
Location :
First Published :
April 17, 2025 11:56 PM IST