Royal Enfield Hunter 350 आता ऑनलाइनही मिळणार; Amazon वरून करा बुकिंग आणि मिळवा जबरदस्त ऑफर्स
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Royal Enfield Hunter 350 ही दमदार रेट्रो बाइक आता थेट Amazon India वरूनही खरेदी करता येणार आहे. त्यामुळे शोरूममध्ये जाण्याची गरज नाही, फक्त काही क्लिकमध्येच तुम्ही घरबसल्या ही बाइक बुक करू शकता.
मुंबई : आजच्या डिजिटल युगात गाड्या, बाइक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सपासून अगदी दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत सर्व काही ऑनलाइन मिळू लागलं आहे. आता बाइकप्रेमींसाठी एक खास बातमी आली आहे. लोकप्रिय Royal Enfield Hunter 350 ही दमदार रेट्रो बाइक आता थेट Amazon India वरूनही खरेदी करता येणार आहे. त्यामुळे शोरूममध्ये जाण्याची गरज नाही, फक्त काही क्लिकमध्येच तुम्ही घरबसल्या ही बाइक बुक करू शकता. कसं करायचं काय करायचं? किंमत किती सगळं जाणून घेऊ
किंमत आणि ऑफर्स
Royal Enfield ने Amazon India सोबत हातमिळवणी करून आपल्या 350cc रेंजमधील बाइक्स ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये Hunter 350 फक्त ₹4,999 बुकिंग अमाउंट भरून बुक करता येईल. या बाइकीची एक्स-शोरूम किंमत ₹1.37 लाख ते ₹1.66 लाख पर्यंत आहे.
यासोबतच No Cost EMI, एक्सचेंज ऑफर आणि क्रेडिट कार्ड युजर्ससाठी खास फायदे उपलब्ध आहेत.
advertisement
इंजिन आणि परफॉर्मन्स
Hunter 350 मध्ये 349cc चं J-सीरीज एअर-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन दिलं आहे, जे 20.2 BHP पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करतं. ही बाइक 5-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-असिस्ट क्लच सोबत येते. त्यामुळे रायडिंग अनुभव अधिक स्मूथ आणि कंट्रोल्ड वाटतो. या बाइकीचे नवीन कलर एडिशन्सही बाजारात आले असून, त्यांची बुकिंग अधिकृत वेबसाइट, अॅप आणि डीलरशिप्सवर सुरू झाली आहे.
advertisement
कोणाशी होते स्पर्धा?
Royal Enfield Hunter 350 ही रेट्रो-स्टाईल सेगमेंटमधील एक मजबूत स्पर्धक आहे. ती TVS Ronin, Honda H’ness CB350/CB350RS, तसेच Jawa 42 आणि Bullet 350 सारख्या बाइक्सला थेट टक्कर देते. मात्र किंमत आणि स्टाइलच्या दृष्टीने Hunter 350 अनेक रायडर्सची पहिली पसंती ठरते.
मायलेज आणि रायडिंग अनुभव
Hunter 350 अंदाजे 36 ते 40 किमी प्रति लिटर मायलेज देते, जे या कॅटेगरीमध्ये उत्तम मानलं जातं. तिचं हलकं वजन आणि छोटा व्हीलबेस शहरातील ट्रॅफिकमध्ये चालवताना उत्तम बॅलन्स आणि कंट्रोल देतात.
advertisement
जर तुम्ही स्टायलिश, पॉवरफुल आणि परवडणारी रेट्रो बाइक शोधत असाल, तर Royal Enfield Hunter 350 ही एक परफेक्ट निवड ठरू शकते — आणि आता ती फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2025 6:09 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Royal Enfield Hunter 350 आता ऑनलाइनही मिळणार; Amazon वरून करा बुकिंग आणि मिळवा जबरदस्त ऑफर्स


