Railway Jobs : भारतीय रेल्वेत 9 हजार पदांसाठी भरती, मिळणार लाखो रुपये पगार, अशी आहे अर्जाची प्रक्रिया
- Published by:Pooja Pawar
- trending desk
Last Updated:
भारतीय रेल्वेचा एकूण विस्तार बघता सर्वात मोठ्या विभागांपैकी एक असलेल्या रेल्वे खात्यात नोकरीची संधी मिळावी, असं अनेक तरुणांचं स्वप्न असतं.
देशात लोहमार्गाचं जाळं खूप मोठं आहे. आजही मोठ्या प्रमाणावर लोक लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. भारतीय रेल्वेचा एकूण विस्तार बघता सर्वात मोठ्या विभागांपैकी एक असलेल्या रेल्वे खात्यात नोकरीची संधी मिळावी, असं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. तुमची देखील हीच इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण भारतीय रेल्वेनं सुमारे नऊ हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. टेक्निशियन पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
भारतीय रेल्वेनं नऊ हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या बाबत पूर्व अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागात टेक्निशियनची विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत अंतिम अधिसूचना जारी होईल. त्यानंतर इच्छुक उमेदवार याकरिता अर्ज भरू शकतात. उमेदवारांना आपले अर्ज रेल्वे भरती बोर्ड अर्थात आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरावे लागणार आहेत. लोकसभा निवडणूक 2024 ची अधिसूचना जारी होण्यापूर्वी मार्च महिन्यात या भरतीची सर्व प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
advertisement
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड टेक्निशियन भरती 2024 च्या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक पात्रतेची घोषणा अंतिम अधिसूचनेत केली जाणार आहे. टेक्निशियनच्या विविध पदांकरिता पात्र देखील वेगवेगळी असेल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आरआरबीच्या अंतिम अधिसूचना कडे लक्ष ठेवावं, असं सांगण्यात आलं आहे.
advertisement
रेल्वे भरती बोर्डानं 21 रेल्वे झोन अंतर्गत टेक्निशियनच्या रिक्त पदांचा तपशील गोळा केला आहे. ही रिक्त पदं या प्रक्रियेत भरली जाणार आहेत. या रिक्त पदांची संख्या सुमारे नऊ हजार असल्याचं सांगितलं जात आहे. तथापि, प्रत्येक झोनमध्ये नेमकी किती पदं रिक्त आहेत, त्याचा अंतिम डाटा नंतर घोषित केला जाणार आहे.
रेल्वे भरती बोर्ड फेब्रुवारी महिन्यात भरती संदर्भातील अंतिम अधिसूचना जारी करेल. त्यानंतर मार्च महिन्यात ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाइन भरावा लागणार आहे. त्यानंतर आलेल्या सर्व अर्जांची छाननी सुरू होईल. त्यादरम्यान लोकसभा निवडणुकीची शक्यता असल्याने छाननीनंतर परीक्षेच्या प्रवेशपत्रांचं वाटप ऑक्टोबरपर्यंत सुरू होईल. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 दरम्यान परीक्षेची तारीख असेल आणि फेब्रुवारी 2025 पर्यंत परीक्षेचा निकाल घोषित केला जाईल. त्यानंतर कागदपत्रांची सत्यता पडताळणीचं काम सुरू होणार आहे. शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 03, 2024 9:42 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Railway Jobs : भारतीय रेल्वेत 9 हजार पदांसाठी भरती, मिळणार लाखो रुपये पगार, अशी आहे अर्जाची प्रक्रिया