14 वर्षांनी लहान, कॅन्सरने ग्रस्त, तरीही नराधमाने टाकली वाईट नजर, अल्पवयीन मुलीसोबत विकृत प्रकार

Last Updated:

Crime in Thane: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर याठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका 13 वर्षीय मुलीवर 27 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर याठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका १३ वर्षीय मुलीवर २७ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी ही कॅन्सरग्रस्त असून मुंबईतील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. असं असूनही नराधमाने तिच्यासोबत विकृतीचा कळस गाठला आहे. आरोपीनं तीन ते चार वेळा पीडित मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. यातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय पीडित मुलगी मुळची बिहारची रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं होतं. तिच्यावर उपचार करण्यासाठी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मुंबईला यावं लागणार होतं. तेव्हा पीडित मुलीच्या गावाशेजारी राहणाऱ्या एका तरुणाने पीडित मुलीसह तिच्या कुटुंबीयांची बदलापूर परिसरात राहण्याची सोय केली. त्यांना भाड्यानं घर घेऊन दिलं. कुटुंबाला आधार देण्याच्या बहाण्याने त्याचं वारंवार घरी येणं जाणं वाढलं होतं.
advertisement
याच काळात आरोपीनं पीडित मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. त्याने तीन ते चार वेळा पीडित मुलीवर राहत्या घरात लैंगिक अत्याचार केला. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. पीडितेला जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तेव्हा ती गर्भवती असल्याचं लक्षात आलं. धक्कादायक बाब म्हणजे आपली मुलगी गर्भवती असल्याचं समजल्यानंतर देखील मुलीच्या आई वडिलांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन वेळा पोलिसांना खोट्या कहाण्या सांगितल्या. पण त्यांचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
14 वर्षांनी लहान, कॅन्सरने ग्रस्त, तरीही नराधमाने टाकली वाईट नजर, अल्पवयीन मुलीसोबत विकृत प्रकार
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement