पॉर्न व्हिडीओ पाहिला आणि शाळकरी मुलांनी 8 वर्षांच्या मुलीसोबत तसंच केलं, नराधम इथंच थांबले नाही..

Last Updated:

तीन आरोपींपैकी दोघे जण 12 वर्षांचे असून, इयत्ता सहावीमध्ये शिकत आहेत. तिसरा आरोपी 13 वर्षांचा असून तो इयत्ता सातवीत शिकतो. 

(प्रतिाकात्मक फोटो)
(प्रतिाकात्मक फोटो)
नंदयाल:अल्पवयीन शाळकरी मुलं मोबाइल फोनचा दुरुपयोग करून भीषण गुन्हे करत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. आंध्र प्रदेशातल्या तीन अल्पवयीन मुलांनी आठ वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. 7 जुलै रोजी नंदयाल जिल्ह्यात ही घटना घडली. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांना अटक केली. तिघांनीही मोबाइलवर पॉर्न व्हिडिओ पाहिल्याचं चौकशीत कबुल केलं. व्हिडिओमध्ये जे काही बघितलं ते करून पाहण्यासाठी त्यांनी पीडितेचा वापर केला. तीन आरोपींपैकी दोघे जण 12 वर्षांचे असून, इयत्ता सहावीमध्ये शिकत आहेत. तिसरा आरोपी 13 वर्षांचा असून तो इयत्ता सातवीत शिकतो.
मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिघांनी मिळून मुलीचा गळा आवळून खून केला. नंदयालचे एसपी अधिराज सिंह राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांनी मुलीचा खून करून तिचा मृतदेह एका कालव्यात ठेवला. त्यानंतर आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. आपल्या मुलांवर कारवाई होईल, अशी भीती आरोपींच्या वडिलांना आणि काकांना होती. त्यामुळे त्यांनी मुलीचा मृतदेह दुचाकीवरून कृष्णा नदीच्या काठावर नेला. तिथे मृतदेहाला दगड बांधून नदीत फेकला.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी होती. अल्पवयीन आरोपींनी तिला फूस लावून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर गळा आवळून तिचा खून केला. राणा म्हणाले, की अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली आरोपींना 10 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपींचे वडील आणि काका यांनाही अटक करण्यात आली आहे.
advertisement
पीडित मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. एसपी म्हणाले, "आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. मुलीचा मृतदेह शोधण्यासाठी आम्ही ड्रोन आणि अंडरवॉटर कॅमेरे यांसारख्या सर्व संसाधनांचा वापर करत आहोत. शोधमोहिमेत मदत करण्यासाठी एनडीआरएफ जवानांनादेखील पाचारण केलं आहे. शोधमोहीम अजूनही सुरू असून मृतदेह सापडेपर्यंत सुरूच राहील."
आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनी सांगितलं, की मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अल्पवयीन पीडित मुलीच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
पॉर्न व्हिडीओ पाहिला आणि शाळकरी मुलांनी 8 वर्षांच्या मुलीसोबत तसंच केलं, नराधम इथंच थांबले नाही..
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement