advertisement

Beed Crime : ''तुझा संतोष देशमुख करतो'', गाडी अडवून तरुणावर सपासप वार, बीडमध्ये खळबळ

Last Updated:

Beed Crime : बीडमधील कायदा सुव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना अद्याप फारस यश आलं नसल्याचे चित्र आहे. तुझा संतोष देशमुख करतो अशी धमकी देत एका तरुणावर सपासप वार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

News18
News18
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने बीड जिल्हाच नव्हे तर राज्यात खळबळ उडाली होती. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. बीडमधील कायदा सुव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना अद्याप फारस यश आलं नसल्याचे चित्र आहे. तुझा संतोष देशमुख करतो अशी धमकी देत एका तरुणावर सपासप वार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
एका वादावरून बीडमध्ये मारहाणीचा प्रकार घडला असल्याचे म्हटले जात आहे. 'तुझा संतोष देशमुख करतो', अशी धमकी देत भररस्त्यात आरोपीने तरूणाची गाडी अडवत कोयत्याने सपासप वार केले. शरीरावर अनेक अधिक गंभीर वार असल्याची माहिती आहे. तरूणाची स्थिती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
बीड जिल्ह्यातील तांदळवाडी तालुक्यातील भिल्ल येथे शेतीच्या बांधावरील वादातून एक धक्कादायक हल्ला घडला आहे. 'तुझा संतोष देशमुख करतो' अशी धमकी देत भरदुपारी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. तांदळवाडी येथील कैलास सांगुळे या तरुणावर प्राणघातक वार करण्यात आले आहे. तो गाडी चालवत असताना चार जणांनी मागून येत रस्त्यात थांबवले आणि कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला. डोके, चेहरा आणि मान या भागांवर गंभीर वार करण्यात आले. हल्ल्यानंतर तो जागीच बेशुद्ध पडला. सध्या त्याच्यावर बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, इतक्या गंभीर स्वरूपाच्या हल्ल्यानंतरही बीड ग्रामीण रुग्णालयात कोणताही पोलिस गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Beed Crime : ''तुझा संतोष देशमुख करतो'', गाडी अडवून तरुणावर सपासप वार, बीडमध्ये खळबळ
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement